लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेशनास नांगर पूजनाने थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:07 PM2018-02-04T12:07:34+5:302018-02-04T12:18:58+5:30

आपणच करुया आपला उद्धार..

Leva Patil society started National Maha Judiciary | लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेशनास नांगर पूजनाने थाटात प्रारंभ

लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेशनास नांगर पूजनाने थाटात प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशनलेझीम पथकाने  स्वागत

रवींद्र मोराणकर / ऑनलाईन लोकमत

पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - कृषी क्षेत्रातून प्रगती साधत शिक्षणाची कास धरून प्रगती साधलेल्या लेवा पाटील समाजाच्या  राष्ट्रीय महाअधिवेशनास शेतक:यांचे प्रतीक असलेल्या नांगर पूजनाने रविवारी सकाळी  पाडळसे, ता. यावल येथे थाटात प्रारंभ झाला. या अधिवेशनासाठी राज्यभरातून समाजबांधव उपस्थित आहेत.
भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रविवार सकाळपासूनच अधिवेशस्थळी समाज बांधव येण्यास सुरुवात झाली. 
तरुणींच्या तालबद्ध लेझीम पथकाने  स्वागत होऊन वारकरी संप्रदाय परंपरेनुसार भजनी मंडळाच्या दिंडीच्या गजरात  मान्यवरांना व्यासपीठावर  आणण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कुटुंब नायक रमेश विठू पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे,  खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे,  जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे,  जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी,  महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे,  शिरीष चौधरी,  शामल सरोदे, मंदा खडसे  आदी  उपस्थित होते. 

आपणच करुया आपला उद्धार..
प्रगतीशील शेतकरी नारायण चौधरी व भारती चौधरी यांच्याहस्ते नांगर पूजन  करण्यात येऊन अधिवेशनास सुरुवात झाली तसेच कुटुंबनायक रमेश विठू पाटील, एकनाथराव खडसे तसेच तरुणींच्याहस्ते  दीपप्रज्वालन करण्यात येऊन अधिवेशनास सुरुवात झाली. 1984 मध्ये झालेल्या अधिवेशनात सादर झालेल्या आपणच करुया आपला उद्धार..  हेच गीत याही अधिवेशनात सादर करण्यात येऊन प्रारंभ झाला. प्रास्ताविक विष्णू भंगाळे यांनी केले. 

लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन
या अधिवेशनानिमित्त लोकमतने काढलेल्या चार पानी विशेष पुरवणीचे अधिवेशस्थळी मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. 

Web Title: Leva Patil society started National Maha Judiciary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.