बाळद बु प्राथमिक शाळेत डिजिटल लायब्ररीचा शुभारंभ

By admin | Published: April 15, 2017 03:15 PM2017-04-15T15:15:24+5:302017-04-15T15:15:24+5:30

जि. प. प्राथमिक शाळा बाळद बु येथे बहिणाई ई लायब्ररी चा शुभारंभ प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

Launch of Digital Library in Balad Bu Primary School | बाळद बु प्राथमिक शाळेत डिजिटल लायब्ररीचा शुभारंभ

बाळद बु प्राथमिक शाळेत डिजिटल लायब्ररीचा शुभारंभ

Next

 पाचोरा,दि.15 -  तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा बाळद बु येथे बहिणाई ई लायब्ररी चा शुभारंभ प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती सुभाष पाटील होते

उपरोक्त लायब्ररी मध्ये सुमारे एक हजार पुस्तकांचा संग्रह केला असून ती अपडेट ठेवली  जाणार आहे. ही सर्व पुस्तके विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत . उद्घाटनानंतर लायब्ररीची लिंक व्हॉटस्अपद्वारे प्रसिद्ध करून ई वाचनालय खुले करण्यात आले. मान्यवरांनी व विद्याथ्र्यांनी ई लायब्ररीचे वाचन केले .डिजीटल लायब्ररी या उपक्रमात संग्रहीत पुस्तकांचे स्क्रीनवर वाचन करता येते. एकाच वेळी अनेक विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करु शकतात. 
या शाळेने आय. एस. ओ. मानांकन प्राप्त केले आहे. शाळेचा ब्लॉग देखील तयार आहे . 

Web Title: Launch of Digital Library in Balad Bu Primary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.