जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 10:17 PM2018-06-07T22:17:18+5:302018-06-07T22:17:18+5:30

 Jalgaon's stolen money from a farmer's dance bars | जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

Next
ठळक मुद्दे२ लाख ९ हजार हस्तगत कल्याण रेल्वेस्थानकावरुन आवळल्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाण


 


आॅनलाईन लोकमत
जळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना गुरुवारी सकाळी सव्वा पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कल्याण रेल्वेस्थानकावर मुसक्या आवळल्या. 
रेल्वेतून तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला घेरले.
सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग १ जून रोजीरात्री साडे आठ वाजता बसस्थानकातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात धागेदोरे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदा शांताराम हटकर (पाटील) रा.मंगलपुरी, मेहरुण, जळगाव याला रविवारी रात्री पकडले होते, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली होती. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याची रुग्णालयातून सुटका झाली. त्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली.
 पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाण
आनंदा याला पकडल्यानंतर रितेश हा मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, संजय सपकाळे, राजेंद्र पाटील,रामचंद्र बोरसे, सुशील पाटील, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांचे पथक तयार केले होते. त्यातील काही जण तीन दिवसापासून कल्याण व उल्हासनगरात ठाण मांडून होते. रितेश हा कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर असून तो फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगरला थांबलेले पथक ३० मिनिटात तेथे पोहचले व काही कळण्याच्या आत त्याला घेरले. त्याला सायंकाळी जळगावात आणण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कुराडे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.


आनंदा हटकरला कोठडी
दरम्यान, आधी अटकेत असलेल्या आनंदा हटकर याला तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

Web Title:  Jalgaon's stolen money from a farmer's dance bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.