जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:56 PM2018-11-15T12:56:11+5:302018-11-15T12:56:50+5:30

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक

Jalgaon district reserves the water reservation reservation | जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक धरणात शिल्लक साठा व त्याचे नियोजन करीत पाणी सोडावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.
गिरणा धरणात २६ सप्टेंबर रोजी ८८८८ दलघफु पाणीसाठा होता. त्यापैकी ७२१४ दलघफु अर्थात ९५ टक्के पाणी आरक्षित केले आहे. मन्याड धरणात जिवंत साठा नसल्याने मृतसाठ्यावर आरक्षण दिले आहे. २७८.९७ दलघफु असलेला १८ टक्के साठा आरक्षित केला आहे. सोबतच बोरी ४६८.६४ दलघफु, हतनूर धरणात ९००५.३३ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी औद्योगिक साठी १५८८.७६ दलघफू, सावादा, भुसावळ, रावेर, यावल, धरणगाव, अमळनेर, चोपडा या नगर परिषदसाठी २१२३.६२ दलघफू आरक्षित, ग्रामीणसाठी ३९८.५० असा एकूण ४११०.८८ दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. वाघूर धरणात ४१९१.३५ दलघफु पाणी साठा आहे. या पैकी १५९२.२५ दलघफू पाणीसाठा आरक्षित केला आहे. गुळ धरणात ६९३.१३ दलघफू पैकी ५२३.३५ दलघफू, बहुळा धरणात पाणी नाही. त्यावर पाचोरा नगर परिषदसह १७ गावे अवलंबून आहे. हिवरा धरणात ११६.८९ दलघफूपैकी १३.२४ दलघफू, तोंडापूर धरणात ८.४८ दलघफूपैकी ५.९३, अग्नावती धरणात ६६.७५ दलघफूपैकी ७.९४ दलघफू, सुकी धरणात १४०७.३० दलघफूपैकी ४५.१६ दलघफू, अंजनी धरणात ८२.०३ दलघफूपैकी ३७.५० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे भोकरबारी धरणात मात्र पाणीसाठाच नाही.
प्रत्येक महिन्याच्या शेवटी धरणात किती साठा शिल्लक आहे त्याचे नियोजन करावे व त्यानुसार पाणी सोडावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक
जिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भविष्यातील टंचाई लक्षात प्रकल्प व धरणातील पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांची परवानगी बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी सिंचनासाठी देता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

Web Title: Jalgaon district reserves the water reservation reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.