दोन महिन्यात जळगाव जिल्हा रुग्णालयाचे रुप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:22 AM2017-08-08T00:22:55+5:302017-08-08T00:23:59+5:30

डॉ. नागुराव चव्हाण : जिल्हा शल्य चिकित्सक पदी रुजू

Jalgaon District Hospital will be transformed in two months | दोन महिन्यात जळगाव जिल्हा रुग्णालयाचे रुप पालटणार

दोन महिन्यात जळगाव जिल्हा रुग्णालयाचे रुप पालटणार

Next
ठळक मुद्दे‘आयपीएस’ अंतर्गत पदे भरणारसमन्वयासाठी सर्वाची घेणार बैठकरुग्णसेवा, शिस्तीला प्राधान्य

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

जळगाव, दि. 7 -  जिल्हा रुग्णालयात मंजूर पदांपैकी सध्या केवळ 33 टक्केच वैद्यकीय अधिकारी असतील आणि त्याचा  रुग्णसेवेवर परिणाम होत असेल तर रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही नूतनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इतकेच नव्हे येत्या दोन महिन्यात डॉक्टरांचे पदे 50 ते 75 टक्क्यांर्पयत भरले जातील, असेही त्यांनी सांगितले. 
 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांची वडाळा, मुंबई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. नागुराव चव्हाण यांनी सोमवार, 7 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचीत केली असता, त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. 
जिल्हा रुग्णालयातील मुख्य समस्या असलेल्या वैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त पदांबाबत डॉ. चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, पदे भरण्यासाठी आरोग्य संचालक, उपसंचालक यांची मंजुरी लागते. येथे 33 टक्केच डॉक्टर असल्याने भारतीय जन आरोग्य मानांकनांतर्गत (आयपीएस) पदे भरण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनीदिली. 
पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देऊ
‘सर्टिफिकेट फिजीशियन सजर्न’ (सीपीएस) या पदव्युत्तर शिक्षणासाठी येथे विद्याथ्र्यांना प्रवेश देण्यात येऊन रिक्त पदांवर मात करण्याचा प्रयत्न करू, असे  डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एमबीबीएसनंतर या पदव्युत्तर शिक्षणासाठी येथे प्रवेश दिल्यास विद्याथ्र्याकडून रुग्णसेवा शक्य असल्याचे ते म्हणाले. अशा विविध उपाययोजना करून रिक्त जागांचा पाठपुरावा करण्यात येईल व जास्तीत जास्त डॉक्टर मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दोन वर्षापासून सर्वत्र सीपीएस पद्धतीने पदे भरली जात आहे. त्याचा येथेही अवलंब करू, असे ते म्हणाले. 
 प्रत्येकाची होणार नोंद
जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्दय़ाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सुरक्षाही महत्त्वाची असून यासाठी रुग्णालयात येणा:या-जाणा:या प्रत्येकाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी ठेवून संबंधिताचे नाव, संपर्क क्रमांक व इतर माहिती ठेवली जाईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. या सोबतच प्रसूती कक्ष व नवजात बालकांच्या कक्षात माता व बालकाला टॅग लावून काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
सिटीस्कॅन मशीन लवकरच कार्यान्वित
जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन आलेले आहे, मात्र तिची केवळ जोडणीअपूर्णअसल्याने ते कामही मार्गी लावून मशीन लवकरच रुग्णसेवेत येईल, असे डॉ चव्हाण यांनी सांगितले.
जळगाव हा माङयासाठी नवीन जिल्हा असून येथील सर्व माहिती जाणून घेत चांगल्या कामासह रुग्णसेवा, शिस्त यांना आपले प्राधान्य राहील, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. 
अन्यथा पत्र..
दुपारी पदभार घेतल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या बाबत त्यांनी सांगितले की, येथील स्वच्छता, सुरक्षितता व नियोजन यावर लक्ष देण्याची गरज आहे. या प्रश्नांवर त्यांनी सध्या संबंधितांना केवळ समजावून सांगितले आहे. यापुढे मात्र पत्र दिले जाईल, असा इशारा दिला. 
पाहणीनंतर उपाययोजनांसाठी समन्वय आवश्यक असल्याने यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, सुरक्षा रक्षक यांची बैठक घेऊन सूचना देण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या हालचाली सुरू असल्याने जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात जाणार असल्याने या बाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले वरिष्ट पातळीवरून जशा सूचना मिळतील, त्या पद्धतीने काम करू. 
वैद्यकीय अधिकारी ते शल्य चिकित्सक
बीड येथे 25 वर्षे आरोग्य सेवेचा डॉ. नागुराव चव्हाण यांना अनुभव असून वैद्यकीय अधिकारी ते जिल्हा शल्य चिकित्सक दरम्यानच्या सर्व पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तब्बल एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात आला आहे. मराठवाडय़ात प्लेगची साथ पसरली असताना या साथरोगावर मात करण्यासाठी तसेच किल्लारी येथे भूकंपग्रस्त भागात सतत 10 दिवस आरोग्य सेवा करीत त्यांनी साथरोगावर मात केली आहे. त्यांच्या या अनुभवाचा जळगाव जिल्हावासीयांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Jalgaon District Hospital will be transformed in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.