कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी जळगावात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 07:35 PM2018-03-03T19:35:48+5:302018-03-03T19:35:48+5:30

कंत्राटी कर्मचारी कृती समितीतर्फे मूकमोर्चा काढत जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

Jalgaon agitation to maintain contractual employees in government service | कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी जळगावात आंदोलन

कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी जळगावात आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देकंत्राटी कर्मचारी कृती समितीतर्फे मूकमोर्चाजिल्हाधिकाºयांना दिले विविध मागण्यांचे निवेदनआंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३- कंत्राटी कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायम करावे या मुख्य मागणीसाठी जिल्हा कंत्राटी कर्मचारी कृती समितीर्फे शनिवार, ३ रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून झाली. सुरुवातीस हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांना निवेदन देण्यात आला. येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी प्रांताधिकारी अभिजित भांडे यांंना निवेदन देण्यात आले.कृती समितीचे अध्यक्ष विजय रामदास शिंदे, उपाध्यक्ष शांताराम वामन अहिरे, सचिव दत्तू हरसिंग पाटील, समन्वयक भिमराव सूरदास व निलेश रायपूरकर आदींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी- शर्र्तींबाबत तसेच या पदावर नियुक्त कर्मचाºयांच्या सेवा नियमीत न करण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने ९ फेब्रुवारी रोजी काढले आहे. हे परिपत्रक संपूर्ण राज्यात शासकीय विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांवर अन्याय करणारे असून यामुळे कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक कर्मचाºयांंना १५ ते २० वर्षे या सेवेत झाली आहेत. अनेक कर्मचाºयांचे शासकीय नोकरीची वयोमर्यादाही संपली असून आताचा हा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे अनेक कर्मचाºयांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे. ही बाब लक्षात घेता हा सेवेत कायम न करण्याचा जीआर मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या संघटनांनी पाठिंबा दिला तसेच सहभागी झाल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/ कर्मचारी महासंघ, सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृति समिती, एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, स्वच्छ भारत मिशन संघटना, मनरेगा संघटना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, एकात्मिक पाणलोट, व्यवस्थापन संघटना, संग्राम संघटना, ग्रामीण भूजल सर्वेक्षण संघटना, सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम संघटना.

Web Title: Jalgaon agitation to maintain contractual employees in government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव