भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:55 PM2018-11-11T23:55:57+5:302018-11-11T23:57:08+5:30

समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.

An Introduction to Bridegroom by All India Leva Patidar Yuuk Mahasangh at Bhusawal | भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळावा

भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळावा

Next
ठळक मुद्देमेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली मेळाव्याला उपस्थिती

भुसावळ : समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.
ते येथील संतोषीमाता सभागृहात रविवारी आयोजित अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश पाटील होते. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जळगावच्या महापौर स्मिता भोळे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी आमदार शिरीष चौधरी, ‘मसाका’ चेअरमन शरद महाजन, पं.स.सभापती प्रीती पाटील, महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, दिनेश भंगाळे, नगरसेवक मुकेश पाटील, अमोल इंगळे, परीक्षित बºहाटे, बंडू भोळे, डॉ.प्रशांत फालक, सुहास चौधरी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेश पाटील यांनी मोबाइलचा संवाद सुलभतेसाठी आहे. त्याच्या वापराने आपल्या जीवनात समस्या उत्पन्न होणार नाही याची काळजी आई-वडील व मुलांनी घ्यावी. विवाह जोडताना कुंडलीतील गुणांपेक्षा जोडीदाराचे गुण बघून विवाह जोडण्याचे आवाहन केले. आपला जोडीदार निवडताना आई-वडिलांना विश्वासात घ्या, असा सल्ला नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिला.
कार्यक्रमात एक हजार विवाह इच्छुकांच्या सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.
प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी तर आभार शहराध्यक्ष देवा वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, नीलेश राणे, नीरज किरंगे, राहुल नेमाडे, अमोल इंगळे, पवन फालक, संकल्प वाणी, विनय चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




 

Web Title: An Introduction to Bridegroom by All India Leva Patidar Yuuk Mahasangh at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.