घरी बसेन पण भाजपात कदापी जाणार नाही, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषदेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:54 PM2017-09-25T22:54:40+5:302017-09-25T22:54:56+5:30

सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले.

Information about the ex-minister Gulabrao Deokar's letter-in-charge, at home, but not in the BJP | घरी बसेन पण भाजपात कदापी जाणार नाही, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषदेत माहिती 

घरी बसेन पण भाजपात कदापी जाणार नाही, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषदेत माहिती 

जळगाव, दि. २५ - सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले.
सोमवारी सायंकाळी आकाशवाणी चौकातील त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रपरिषद झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगराध्यक्ष नीलेश पाटील, युवक अध्यक्ष विशाल देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देवकर हे भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, असे विधान अमळनेर येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतेच केल्याने देवकर हे भाजपात जातात की काय? अशी चर्चा पसरल्याने त्यांनी आपली भूमिका मांडली.
खडसेंनी पूत्र विशालला देवू केलेली उमेदवारी नाकारली
पक्षाने आपल्याला कमी कालावधीतच मंत्रीपद दिले होते. पक्षाचे तसेच पवार परिवाराचे आपल्यावर उपकार आहेत, हे मी विसरु शकत नाही. विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी पूत्र विशाल देवकर यांना उमेदवारी देवू केली होती मात्र पक्षाच्या एकनिष्ठतेमुळे आपण ती नाकारली.
पक्षनिष्ठेमुळे भाजपाची खासदारकीची आॅफर नाकारली
गेल्या नव्हे तर त्या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपणाला भाजपाकडून विचारणा झाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवरील निष्ठेमुळेच आपण तेव्हाही ती आॅफर नाकाराली. परंतु विरोधक नेहमीच आपल्या बाबत वेगवेगळ्या अफवा पसरवत असतात, असेही गुलाबराव देवकर म्हणाले.
मनपात राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची शक्यता
मनपा तसेच पुढील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नवीन कार्यकारिणीसह जोमाने कामास लागणार असून राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आताही विश्वासाने आपणावर ही जबाबदारी सोपविल्याचेही देवकर यांनी सांगितले. मनपात खाविआसोबत लढयाचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतली परंतु पक्षाच्या धोरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल असा निर्णय होवू शकतो, असा अंदाजही त्यांंनी व्यक्त केला.
विशाल यांच्या ऐवजी दुस-यास संधी मिळावी!
पक्षाने पूत्र विशाल देवकर यांना शहर युवक अध्यक्षपदाची विश्वासाने जबाबदारी टाकल्याचा आनंदच आहे मात्र मी पूर्णवेळ राजकारणात असल्याने विशाल हे संस्थेचे कामकाज पाहत असल्याने त्यांना पदाच्या कामासाठी पक्षास वेळ देणे अवघड आहे, म्हणून ही संधी दुसºयास देण्याची श्रेष्ठींना विनंती करणार आहे. यावर ते जो आदेश देईल तो मान्यच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नोटबंदी, जीएसटी, महागाई, फसवी शेतकरी कर्जमाफी आदीमुळे जनता सध्या भाजपा सरकारवर नाराज असून याचा लाभ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. राष्ट्रवादी सर्वाधिक जागा घेईल, असा विश्वासही देवकर व्यक्त केला.

Web Title: Information about the ex-minister Gulabrao Deokar's letter-in-charge, at home, but not in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा