पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:40 PM2018-05-28T14:40:42+5:302018-05-28T14:40:42+5:30

पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़

Housewife burglary at Pimplala | पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्यांनी लांबविला लाखाचा ऐवजअज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलरामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२८ : पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ याबाबत घरमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
धन्नाराम प्रजापत हे पत्नी किरणदेवी, दोन मुलं तसेच एक मुलगी व भाऊ ताराचंद यांच्यासह पिंप्राळा येथील विद्यानगरात वास्तव्यास आहेत़ धन्नाराम यांचा मार्बलचा व्यावसाय आहे़ पत्नी किरणदेवी व मुले व मुलगी हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले असल्यामुळे धन्नाराम व ताराचंद हे दोघे भावंड घरीच आहेत़ त्यामुळे नेहमी प्रमाणे दोघे सकाळी ९ वाजता दादावाडी येथील मार्बलच्या दुकानावर घराला कुलूप लावून निघाले़ याच दरम्यान चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत भरदिवसा घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत आत प्रवेश केला़ कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोकडवर डल्ला मारीत चोरटे पसार झाले़
दुपारी ४ वाजता ताराचंद हे कपडे व इतर साहित्य घरी ठेवण्यासाठी आले़ तेव्हा त्यांना कडी-कोयंडा तुटलेले दिसून आले़ घरात आत जाऊन पाहिल्यानंतर सामान फेकलेले होते़ तर कपाट देखील फोडलेले होते़ त्यातील दागिने व रोकड चोरीला गेल्याचे दिसले़ याबाबत त्यांनी लागलीच भाऊ धन्नाराम यांना कळविले़ व सायंकाळी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली़

Web Title: Housewife burglary at Pimplala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.