भुसावळ तालुक्यात दरमहा ६००-७०० क्विंटल धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:01 PM2018-11-16T15:01:25+5:302018-11-16T15:02:32+5:30

राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण मोहिमेमुळे ई-पॉस वितरण प्रणालीमध्ये धान्याच्या वितरण पद्धतीत पारदर्शकता आली आहे. यामुळे लाभार्र्थींना त्यांचे धान्य व केरोसिन उपलब्ध होत आहे. तसेच आधार सिडींगमुळे अपात्र शिधापत्रिका धान्य व केरोसिनची बचत होत असून, भुसावळ तालुक्यात दर महिन्याला ६००-७०० क्विंटल धान्याची बचत होत असल्याचे समोर आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

 Grains savings of 600-700 quintals per month in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यात दरमहा ६००-७०० क्विंटल धान्याची बचत

भुसावळ तालुक्यात दरमहा ६००-७०० क्विंटल धान्याची बचत

Next
ठळक मुद्देई-पॉस वितरण प्रणालीमुळे पारदर्शकता१२१ स्वस्त धान्य दुकानांमध्ये १२१ ई-पॉश मशीनद्वारे धान्य व केरोसिनचे वाटपतालुक्यातील प्राधान्यवर्गच्या एक लाख ७९ हजार ७३० तर अंत्योदयच्या पाच हजार १७७ लाभार्थींना वितरण

भुसावळ, जि.जळगाव : राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण मोहिमेमुळे ई-पॉस वितरण प्रणालीमध्ये धान्याच्या वितरण पद्धतीत पारदर्शकता आली आहे. यामुळे लाभार्र्थींना त्यांचे धान्य व केरोसिन उपलब्ध होत आहे. तसेच आधार सिडींगमुळे अपात्र शिधापत्रिका धान्य व केरोसिनची बचत होत असून, भुसावळ तालुक्यात दर महिन्याला ६००-७०० क्विंटल धान्याची बचत होत असल्याचे समोर आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.
तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती बुधवारी दिली. यावेळी नायब तहसीलदार आर.एल. राठोड, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पुरवठा अव्वल कारकून पी.पी.कांबळे उपस्थित होते.
तालुक्यातील १२१ स्वस्त धान्य दुकानांमध्ये १२१ ई-पॉश मशीनद्वारे धान्य व केरोसिनचे वाटप होत आहे. यामुळे वितरण पद्धतीत पारदर्शकता आली आहे. याचा लाभ तालुक्यातील प्राधान्यवर्गच्या एक लाख ७९ हजार ७३० तर अंत्योदयच्या पाच हजार १७७ लाभार्थींना होत आहे. लाभार्र्थींनी धन्य खरेदी करताना दुकानदाराकडून पावती घेण्याचा आग्रह करावा व पावतीनुसार धान्य तपासून घ्यावे. तसेच याबाबत लाभार्र्थींमध्ये जागरुकता करावी. लाभार्र्थींनी ई-पॉस मशीनद्वारे धान्य मिळण्याठी आपले आधार लिंक करावे तसेच प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहनही निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले.


 

Web Title:  Grains savings of 600-700 quintals per month in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.