सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर

By विलास बारी | Published: March 22, 2024 10:03 PM2024-03-22T22:03:46+5:302024-03-22T22:04:10+5:30

Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली.

Gold price drops by 900, the price is at 66,400 thousand rupees, the gold market is unstable due to large fluctuations. | सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर

सोन्याचा दरात नऊशेची घसरण, भाव ६६,४०० हजार रुपयांवर, मोठ्या चढ-उतारीने सुवर्ण बाजार अस्थिर

- विलास बारी
जळगाव - गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. यासोबतच गुरुवारी ७६ हजारांवर पोहचलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

सलग तीन दिवस भाववाढ होत गेलेल्या सोन्याच्या भावात गुरुवार, २१ मार्च रोजी थेट एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते ६७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. मात्र शुक्रवार, २२ मार्च रोजी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली व सोने ६६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

दुसरीकडे चांदीच्याही भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र शुक्रवारी चांदीतही एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

अमेरिकेतील बँकिंग स्थितीमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहे. मात्र ही वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाल्याने शुक्रवारी त्यात घसरण झाली व भाव स्थिरावत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र अशा अचानक चढ-उताराने सुवर्ण बाजार अस्थिर होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Gold price drops by 900, the price is at 66,400 thousand rupees, the gold market is unstable due to large fluctuations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.