आठवडाभरात सोने ८०० रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:16 PM2018-11-17T12:16:39+5:302018-11-17T12:20:21+5:30

चांदीही हजार रुपयांनी घसरली

Gold dropped by Rs 800 to Rs. 800 per week | आठवडाभरात सोने ८०० रुपयांनी घसरले

आठवडाभरात सोने ८०० रुपयांनी घसरले

Next
ठळक मुद्देग्राहकांना दिलासासोने ३२ हजाराच्या खाली

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव घसरल्याने त्याचा परिणाम भारतातही झाला असून आठवडाभरात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््याने घसरले आहेत. चांदीच्याही भाव एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली आहे. ऐन खरेदीच्या हंगामात भाव कमी झाल्याने त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने भारतात ऐन खरेदीच्या हंगामात सोन्याचे भाव गडगडले आहे.
सोने ३२ हजाराच्या खाली
गेल्या महिन्यात सोने ३२ हजारावर पोहचले होते. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासून सोने ३२ हजार ४०० रुपयांवर होते. मात्र अमेरिकेत सोन्याचे भाव कमी होताच ९ नोव्हेंबर, भाऊबीजेपासून कमी होत गेले. १० नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ९०० रुपये प्रती तोळ््यावर येऊन सोने पुन्हा ३२ हजाराच्या खाली आले. तेव्हापासून घसरण सुरूच असून १२ नोव्हेंबरनंतर २०० रुपयांनी पुन्हा सोन्याचे भाव कमी होऊन ते १३ रोजी ३१ हजार ७०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा १०० रुपयांनी घसरण होऊन १४ रोजी ३१ हजार ६०० रुपयांवर सोने आले. १५ रोजीदेखील ते ३१ हजार ६०० रुपयांवर स्थिर राहिले. एकूणच आठवडाभरात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््यांनी कमी झाल्याचे सुवर्ण बाजारात चित्र आहे.
चांदीत एक हजार रुपयांनी घसरण
चांदीच्याही भावात अशाच प्रकारे घसरण सुरू असून दिवाळीपासून ४० हजार रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल एक हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली, ती ३९ हजार रुपयांवर आली. गेल्या तीन दिवसांपासून चांदी ३९ हजार रुपये प्रती किलोवर स्थिर आहे.
दोन-चार दिवसात पुन्हा तेजीची शक्यता
आता सोने-चांदीचे भाव कमी झाले असले तरी मागणीचा विचार करता आंतरराष्ट्रीय पातळीसह भारतातही सोने-चांदीचे भाव पुन्हा पूर्ववत येण्याचे अर्थात पुन्हा भाववाढीचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना सोने-चांंदी खरेदीची पर्वणी मानली जात आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने भारतातही त्यांचे दर कमी झाले आहे. मात्र दोन ते चार दिवसात हे भाव पुन्हा पूर्ववत होतील.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold dropped by Rs 800 to Rs. 800 per week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.