एकास कारने उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 02:26 PM2019-04-26T14:26:06+5:302019-04-26T14:26:45+5:30

पारोळा : उपचारादरम्यान गाठले मृत्यूने

Fly with the same car | एकास कारने उडवले

एकास कारने उडवले

Next


पारोळा : कारने धडक दिल्याने शांताराम बुधा शेटे (वय ७३, रा.म्हसवे) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. २४ रोजी सायंकाळी सातला म्हसवे फाट्याजवळ ही घटना घडली.
शांताराम शेटे हे शेतातून म्हसवे येथे घरी जात होते. तेव्हा म्हसवे फाट्यावर रस्ता ओलांडत असताना जळगावकडून धुळ्याकडे जाणाºया कार (एमएच-४४-पी-८८२४) ने भरधाव वेगात धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून पायाचे हाड मोडले गेले. तसेच त्यांच्या डोक्यास, हातापायास जबर दुखापती झाल्या. जखमी शांताराम शेटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ धुळे हलविण्यात आले. उपचार घेत असताना त्यांचा २५ रोजी मृत्यू झाला.
याप्रकरणी पारोळा पोलिसात मोतीलाल श्यामराव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकाँ जयवंत पाटील करीत आहे.

Web Title: Fly with the same car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.