जळगावात सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 06:20 PM2019-01-26T18:20:08+5:302019-01-26T18:20:26+5:30

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहण राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते  झाले.

Flag hoisting of Sadbhau Khot in Jalgaon | जळगावात सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण 

जळगावात सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण 

Next

जळगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहण राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते  झाले. येथील पोलीस कवायत मैदानावर  मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यानंतर राज्यमंत्री खोत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शानदार संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम
ध्वजारोहण समारंभानंतर राज्यमंत्री यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. तसेच त्यांनी उघड्या जीप मधून संचलनाची पाहणी केली. संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधिक्षक सचिन कदम यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय, महिला व पुरुष पथके, शहर वाहतुक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, आर. आर. विद्यालयाचे एनसीसी, आरएसपी मुले/मुली, ए. टी. झांबरे विद्यालयाचे एनसीसी, ला. ना. विद्यालयाचे एनसीसी, बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे एनएसएस, सेंट जोसेफचे आरएसपी मुले, सेंट टेरेसा आरएसपी मुली, ओरियन स्टेट इंग्लिश मिडीयम स्कुलचे आरएसपी व स्काऊट गाईड मुले/मुली, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे आरएसपी मुले/मुली, सिद्धी विनायक स्कुलचे आरएसपी मुले, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे आरएसपी मुले, जळगाव पोलिस दलाचे बॅण्ड पथक, पोलीस श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक , वरुण पथक, अग्निशमन दल, रेस्क्यू पथक, वनविभागाचा 33 कोटी वृक्ष लागवडीचा चित्ररथ, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा चित्ररथ, जळगाव शहर महानगरपालिकेचा स्वच्छ भारत अभियानाचा चित्ररथ, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या चित्ररथांचा या संचलनामध्ये समावेश होता. 

यावेळी आर. आर. विद्यालय, प. न. लुंकड विद्यालय, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल. नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालय, ओरीऑन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तर  योगा प्रशिक्षक अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चमुने महात्मा गांधी थिम भारतीय योगशास्त्र योगासने सादर केली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ लोककलेतुन लोकजागर कार्यक्रम, जिल्हा महिला बाल विकास विभाग, जळगाव व रिजनल आऊटरेज ब्युरो गीत नाटक विभाग, पुणे द्वारा प्रस्तुत. फिजिकल डेमो आणि वेपन टॅक्टिस QRT ग्रृप पोलीस मुख्यालय, जळगाव यांनीही विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

मान्यवरांचा सन्मान व पुरस्कार वितरण
परेड निरिक्षणानंतर खोत यांच्या हस्ते पोलीस दलामध्ये, नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवापुर्ण केल्याबद्दल सपोनि  सचिन अशोक बागुल, नेमणुक नशिराबाद, पोलीस ठाणे, पोउपनि सुजित पंडीत ठाकरे, नेमणुक यावल, पोलीस ठाणे, यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. तर पोलीस नाईक  मनोज अण्णा मराठे यांना उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षक पदक प्रदान करण्यात आले.

जिल्हा क्रीडा पुरस्कार - गुणवंत खेळाडू (पुरुष)  विजय लक्ष्मण न्हावी व (महिला) कु. पुजा अरुण महाजन (खेळ-आट्यापाट्या), गुणवंत क्रिडा मार्गदर्शक- प्रा. हरिष मुरलीधर शेळके (खेळ-कबड्डी), गुणवंत क्रिडा संघटक/ कार्यकर्ता- आसिफ खान अजमल खान (खेळ- हॉकी) यांनाही गौरविण्यात आले.

समग्र शिक्षा, जिल्हा प्रकल्प कार्यालय, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, जळगाव -  दत्तुसिंग पाटील, जिल्हा समन्वयक यांनी सन 2018-19 वर्षात 3 ते 18 वयोगटातील दिव्यांग बालकाचा शोध घेऊन, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. तसेच 24 कर्णदोष लाभार्थ्यांना श्रवणयंत्र पुरवठा करण्याचे उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कांताई नेत्रालय संस्था, जळगाव मधील अमरनाथ चौधरी, व्यवस्थापक प्रमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव, शालेय आरोग्य अभियान अंतर्गत 120 पेक्षा जास्त बालकांवर नेत्रातील व्यंग, तिरळेपणा दोष दुर होणेस व 10 हजार मोफत शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिगंबर वामनराव पगार (भा.व.से.) उप वनसंरक्षक, जळगाव यांनी त्यांचे कार्यालय आयएसओ 9001 केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार 2019-  मिनाक्षी राजाराम निकम, यांनी दिव्यांगत्वावर मात करुन असीम कर्तत्वाने उद्योग क्षेत्रात यश संपादन करुन नावलैकीक मिळविल्याबद्दल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव यांनी दिव्यांग कल्याण क्षेत्रात जिल्हास्तरावर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रमार्फत दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन व इतर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, तर  मधुकर जुलाल ठाकूर, रा. कासोदा, ता. एरंडोल यांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार केल्याने त्यांचा सन्मान राज्यमंत्री ना. खोत यांच्या हस्ते करण्यात आला. 
     
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर स्मिता भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी. नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, राहूल जाधव, यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन जी. एम. उस्मानी, राजेश यावलकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, राहूल जाधव यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहन करण्यात आले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ च्या आवारातही सकाळी आठ वा. ध्वजवंदन करण्यात आले. जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सरस्वती बागूल यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्वांनी बेटी बचाओ, बेटी पढाओची शपथ घेतली.

Web Title: Flag hoisting of Sadbhau Khot in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.