जामनेरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:04 PM2018-09-24T23:04:09+5:302018-09-24T23:06:08+5:30

जामनेर तालुक्यासह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या शस्त्रधारी टोळीला रविवारी रात्री जेरबंद करण्यात आले.

Five people preparing to throw robbery in Jamnar | जामनेरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी जेरबंद

जामनेरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली चोरीची दुचाकी जप्तआरोपींकडून गावठी कट्टा व काडतूस, हत्यार जप्तपळून जाण्याच्या प्रयत्नातील एका आरोपीला पकडले

जामनेर : तालुक्यासह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या शस्त्रधारी टोळीला रविवारी रात्री जेरबंद करण्यात आले. टोळीतील पाचही आरोपी कडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, ९ मोबाईल, सिमकार्ड, चॉपर, तीन मोटरसायकलसह दरोड्यात लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक, येथे नेरी पहूर रस्त्यावर खोडपे पेट्रोल पंपाच्या पुढे चार ते पाच अज्ञात इसम संशयास्पदरित्या फिरत आहे त्यांच्याजवळ हत्यार असल्याची गुप्त माहिती नेरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांना रविवारी रात्री मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या सुचनेवरून उपनिरीक्षक विकास पाटील, तुषार पाटील, सचिन चौधरी, सचिन पाटील,विनोद पाटील, योगेश महाजन, राहुल पाटील, मनोज धनगर हे तातडीने रवाना झाले. अतिशय शिताफीने सापळा रचून त्यांनी ५ संशयीतांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
पोलिसांनी अमोल गोकुळ पाटील (वय २५ रा.मोहाडी ता.जामनेर), सलमान अहमदखान (वय २१ रा. ताबांपुरा जळगावं), आरीफ जंहागीर देशमुख (वय २१ रा. रामनगर जळगांव), सय्यद सलमान सय्यद कासिम (वय २४ रा. महादेव मंदिर जळगाव) याच्यासह एक अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन पाटील यांची फिर्यादीवरून भादवी कलम ३९९, ४०२ सह ३/२५, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Five people preparing to throw robbery in Jamnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.