महिला डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस सहा महिन्यांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:35 AM2018-12-20T07:35:32+5:302018-12-20T07:36:21+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन डॉक्टर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भुसावळ येथील डॉ. चेतन सुरेश सूर्यवंशी यास पोलिसांनी सहा महिन्यानंतर भुसावळ येथून बुधवारी अटक केली.
Next
जळगाव : चारित्र्यावर संशय घेऊन डॉक्टर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भुसावळ येथील डॉ. चेतन सुरेश सूर्यवंशी यास पोलिसांनी सहा महिन्यानंतर भुसावळ येथून बुधवारी अटक केली. टाकळी प्र.चा. (ता. चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांचा विवाह भुसावळ येथील डॉ. चेतन सुरेश सूर्यवंशी यांच्याशी १४ डिसेंबर २०१७ रोजी झाला होता. लग्नानंतर महिन्याभरात तिचा चारित्र्याच्या संशयावरून सासरकडील मंडळींकडून छळ सुरू झाला होता. या छळाला कंटाळून स्मिता हि माहेरी आली होती. सहा महिन्यापूर्वी तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. डॉ. चेतन यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.