जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हिंग’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:23 PM2018-05-17T21:23:37+5:302018-05-17T21:23:37+5:30

मान्सूनपूर्व आढावा बैठक

 For the first time in the district, 'scuba diving' is used | जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हिंग’चा वापर

जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हिंग’चा वापर

Next
ठळक मुद्देआपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन नाले-गटारींची साफसफाई आवश्यक

जळगाव : यंदा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीशी मुकाबला करताना शोधकार्यासाठी जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हींग’चा वापर करण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक गुरूवारी दुपारी नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी यावेळी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित या बैठकीस व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ उपस्थित होते.
नाले-गटारींची साफसफाई आवश्यक
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आपत्तीजन्य परिस्थितीत उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करताना त्या साधनांचा वापर यंत्रणेतील कर्मचाºयांना करता आला पाहिजे. यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यास जिवीतहानी टाळण्यास मदत होते. मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेताना पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका व नगरपालिका भागातील गटारींची साफसफाई होणे आवश्यक आहे.
विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडणे, पूरपरिस्थितीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. तसेच त्यांना नदी, नाले ओलांडू देवू नये.
वाहने पूराच्या पाण्यातून नेऊ देवू नये. साथीचे रोग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य केद्रांच्या ठिकाणी पुरेसे औषधे उपलब्ध ठेवण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
तसेच ज्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडतो तसेच जे रस्ते पुराच्या पाण्याखाली येतात. त्यांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेने घेऊन ठेवावी व त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्यात.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, होमगार्ड, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्कुबा डायव्हिंगचे तीन सेट
यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, होमगार्ड, जलसंपदा विभाग यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. आपत्तीजन्य परिस्थितीत खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्कुबा डायव्हिंगचे तीन सेट घेण्याचे आले असून या सेटच्या वापराचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच भविष्यात जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ यांनी दिली.

Web Title:  For the first time in the district, 'scuba diving' is used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.