पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:24 PM2018-12-22T18:24:19+5:302018-12-22T18:25:50+5:30

‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाला संचालक प्राचार्य डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले.

Environment and development should go hand in hand - Principal Dr. T. Ingale | पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे

पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळ येथे कोटेचा महाविद्यालयात ‘पर्यावरण आणि शाश्वत’ विषयावर अधिवेशनपृथ्वीवर जरी हवा, पाणी आणि पाणी उपलब्ध असले तरी ते सर्व शुद्ध स्वरूपात मिळणे अशक्यविविध ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि प्राध्यापक सहभागी

भुसावळ, जि.जळगाव : ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाला संचालक प्राचार्य डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले.
येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात वनस्पती शास्त्र व भूगोल विभागातर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी झाले .
‘पर्यावरण आणि शाश्वत’ या विषयावरील अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा होत्या.
डॉ.इंगळे पुढे म्हणाले की आपल्या पृथ्वीवर जरी हवा, पाणी आणि पाणी उपलब्ध असले तरी ते सर्व शुद्ध स्वरूपात मिळणे अशक्य आहे. कारण सध्या पर्यावरणीय समस्या वाढत आहे व वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे जल, मुद्रा आणि हवा प्रदूषण वाढत आहे. भारतात दरवर्षी ११ टक्के वाहने वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे अर्थात मानवाचा विकास व्हायलाच हवं, पण पर्यावरणाची बळी देऊन विकास किंवा विकासाची बळी देऊन पर्यावरण शक्य नाही, हे लक्षात घेऊन पर्यावरण आणि विकास हातात हात धरूनच जायला हवेत.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा म्हणाल्या की, आपल्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे, असे मानून आम्ही आमच्या महाविद्यालयात गांडूळ खत प्रकल्प सौर दिवे शोषखड्डा हे उपक्रम महाविद्यालयात राबवत आहोत, आपण त्यांचे अवलोकन करून आपल्या सूचना कराव्यात, शाश्वत पर्यावरणासाठी आम्ही यांच्या विचार अवश्य करू.
या परिषदेत विविध ठिकाणाहून पर्यावरणप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळा संयोजक उपप्राचार्य डॉ.जे.एस.धांडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मीना चौधरी आणि प्राचार्या जे.व्ही.बोंडे यांनी संचलन केले. अधिवेशन निमंत्रक उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील यांनी आभार मानले.

 

Web Title: Environment and development should go hand in hand - Principal Dr. T. Ingale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.