राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही आज पासून ई-वे बिल सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:39 PM2018-05-24T19:39:16+5:302018-05-24T19:39:16+5:30

E-Way bill mandatory for the state's freight traffic today | राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही आज पासून ई-वे बिल सक्तीचे

राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही आज पासून ई-वे बिल सक्तीचे

Next
ठळक मुद्देशासनाने केला अध्यादेश जारी५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी आवश्यकताव्यापाऱ्यांना करावी लागणार नोंदणी

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२४ : आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल प्रणाली अंमलात आल्यानंतर आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले असून २५ मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात ३१ मार्च रोजीच अध्यादेश काढण्यात आला आहे.
देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाल्यानंतर आंतरराज्य मालाची वाहतूक करण्यासाठी ई -वे बिल ही प्रणाली लागू करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठीही ई-वे बिल अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात आला.
५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी ई -वे बिल
एका ठिकाणाहून कोणताही माल नेताना माल पोहचविण्याचे ठिकाण ५० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्यासाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजारापेक्षा जास्त दराचा माल असेल तरच ई -वे बिल लागणार आहे.

Web Title: E-Way bill mandatory for the state's freight traffic today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.