जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:00 PM2018-03-03T17:00:49+5:302018-03-03T17:02:43+5:30

एरंडोल येथे अकाउंटच्या कामासाठी जात समोरुन भरधाव वेगाने येणाºया आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने अमीतकुमार रामगोपाल पांडे (वय ३७ रा. कोल्हे नगर, जळगाव) हे अकाउंटट जागीच ठार तर त्यांचे मित्र गोपाल राजूरकर (रा.जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उत्तर महाराष्ट विद्यापीठाजवळ झाला.

Due to heavy rains, a truck carrying two-wheeler rammed into Jalgaon highway | जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले 

जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले 

Next
ठळक मुद्दे अकाउटंट ठार तर दुसरा जखमीहा अपघात उत्तर महाराष्ट विद्यापीठाजवळ झाला.ट्रक चालकाला घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३ : एरंडोल येथे अकाउंटच्या कामासाठी जात समोरुन भरधाव वेगाने येणा-या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने अमीतकुमार रामगोपाल पांडे (वय ३७ रा. कोल्हे नगर, जळगाव) हे अकाउंटट जागीच ठार तर त्यांचे मित्र गोपाल राजूरकर (रा.जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उत्तर महाराष्ट विद्यापीठाजवळ झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमीतकुमार पांडे व गोपाल राजूरकर हे शनिवारी सकाळी दुचाकीने एरंडोल येथे जात असताना उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे प्रवेशद्वार सोडल्यानंतर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघंही दुचाकीसह बाहेर फेकले केले. अमीतकुमार यांना ट्रकचा जोरदार फटका बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. अपघात होताच रस्त्यावरुन जाणाºया लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीवरील दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Due to heavy rains, a truck carrying two-wheeler rammed into Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.