भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत 

By चुडामण.बोरसे | Published: March 20, 2024 02:05 PM2024-03-20T14:05:11+5:302024-03-20T14:06:01+5:30

दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

drugs worth 72 lakh seized in bhusawal two people arrested | भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत 

भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत 

भुसावळ (जि.जळगाव) : भुसावळात मंगळवारी रात्री १० वाजता पोलिसांनी एका हाॕटेलवर धडक कारवाई करीत तब्बल ७२ लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले. यात १८ प्रकारचे ड्रग्ज आहेत. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

कुणाल भरत तिवारी (३०, रा.तापी नगर, भुसावळ) आणि जोसेफ जाॕन(३२, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे  आहेत. 
त्यांच्याकडून कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी असे १८ प्रकारचे  ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.  या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Web Title: drugs worth 72 lakh seized in bhusawal two people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.