जळगावात मद्यधुंद तरुणाने घेतला नगरसेवकाला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:57 PM2018-07-09T12:57:11+5:302018-07-09T12:57:28+5:30

जिल्हा रुग्णालयात उपचार

Drinking water from a young farmer in Jalgaon | जळगावात मद्यधुंद तरुणाने घेतला नगरसेवकाला चावा

जळगावात मद्यधुंद तरुणाने घेतला नगरसेवकाला चावा

Next

जळगाव : भावाची भेट घेऊन घरी जात असताना नगरसवेक पृथ्वीराज सोनवणे (रा़ आदर्शनगर) यांच्याशी एका मद्यपी तरूणाने वाद घालत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली़ यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले़
आदर्शनगरातील रहिवासी पृथ्वीराज सोनवणे हे पत्नीसह सायंकाळी आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळ राहत असलेले त्यांचे भाऊ शरद सोनवणे यांच्याकडे आले होते़ रात्री ९ वाजता ते घरी जाण्यासाठी त्यांच्या दुचाकीजवळ आले़ त्यावेळी त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे भाऊ देखील घराबाहेर आले़
याचवेळी त्या ठिकाणी एक मद्यपी तरूण आला़ त्याने पृथ्वीराज सोनवणे यांच्याशी कारण नसताना वाद घातला़ हा प्रकार शरद सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरूणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ परंतू, त्याने चक्क शरद सोनवणे यांची कॉलर पकडून आणखी वाद घातला़ यानंतर पृथ्वीराज सोनवणे यांनी त्याची पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ परंतू, एकही ऐकून न घेता तो तरूण नगरसेवक सोनवणे यांच्या अंगावर धाऊन आला़ अन् त्याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला़ यात त्यांच्या हाताला ईजा झाली़ त्यानंतर तो तरूण त्या ठिकाणाहून पसार झाला़ हा प्रकार घडल्यानंतर सोनवणे यांनी त्वरीत रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले़ परंतू, हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना पोलिसांनी आधी उपचार घेण्याबाबत सल्ला दिला़ त्यांनी त्वरीत जिल्हा रूग्णालयात जाऊन उपचार घेतले़
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ तरुणांनी गोंधळ घातला होता. आता पुन्हा एका तरुणाने चक्क नगरसेवकाला चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे.
सोनवणे यांनी या मद्यपीवर कारवाई करण्याची मागणी रामानंद नगर पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या मद्यपीचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापडलेला नाही.

Web Title: Drinking water from a young farmer in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.