कालबाह्य खेळांची चित्रे बेल्जियममधील प्रदर्शनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 11:51 AM2019-01-16T11:51:10+5:302019-01-16T11:57:43+5:30

गिलोरी, विटू दांडू अशा कालबाह्य झालेल्या खेळांच्या चित्रांनी बेल्जियममधील फ्लोरीस लुक जॉस डेव्हरीएन्डेट या शास्त्रज्ञाला अक्षरश: भुरळ घातली. ही चित्रे त्यांनी थेट मागवून घेतली आणि पुढील महिन्यात ते त्याचे प्रदर्शनही भरविणार आहेत.

drawings of outdated sports will be displayed in exhibition organised in belgium | कालबाह्य खेळांची चित्रे बेल्जियममधील प्रदर्शनात

कालबाह्य खेळांची चित्रे बेल्जियममधील प्रदर्शनात

googlenewsNext

- चुडामण बोरसे

जळगाव : गिलोरी, विटू दांडू अशा कालबाह्य झालेल्या खेळांच्या चित्रांनी बेल्जियममधील फ्लोरीस लुक जॉस डेव्हरीएन्डेट या शास्त्रज्ञाला अक्षरश: भुरळ घातली. ही चित्रे त्यांनी थेट मागवून घेतली आणि पुढील महिन्यात ते त्याचे प्रदर्शनही भरविणार आहेत. चोेपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील कलाशिक्षक कमलेश अशोक गायकवाड यांची ही चित्रे आहेत. या चित्रांची वैशिष्ट्ये म्हणजे जे क्रीडा प्रकार आज कालबाह्य झालेले आहेत. ज्यातून पूर्वी व्यक्तीचा शारीरिक, मानसिक विकास उत्तमप्रकारे व्हायचा व बालकांना मनसोक्त आनंद प्राप्त व्हायचा. तेच प्रसंग या चित्रात यांनी अतिशय जिवंत स्वरूपात मांडण्यात आले आहेत.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजची पिढी व्हीडीओ गेम, इंटरनेट, मोबाईल, टीव्ही या माध्यमात आनंद व मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते; ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे बालकांना स्वच्छंद आनंद देणारे खेळप्रकार या चित्रात उभे करण्याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला आहे.
चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे नातेवाईक बेल्जीयममध्ये आहेत. त्यांचा आणि शास्त्रज्ञ फ्लोरीस लुक यांचा परिचय. वरील खेळ प्रकाराची चित्रे महाजन यांनी आपल्या नातेवाईकांना व्हॉटस्अ‍ॅपनी पाठविली. ती त्यांनी फ्लोरीस लुक यांना दाखविली. लूक यांना ही चित्र फारच आवडली आणि चक्क यातील काही चित्रे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे गायकवाड यांनी ही चित्रे बेल्जीयमला पाठविली आहेत. आता चोपड्याच्या कलावंतांने काढलेली ही चित्रे बेल्जीजमधील एका प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.
कमलेश यांचे वडील अशोक गायकवाड हे कलाशिक्षक आहेत. वडिलांकडूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. कलेची आवड असल्यामुळे कला या विषयातच गायकवाड यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

त्यांच्या कुंचल्यातून प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर तसेच अनेक महापुरुषांची व्यक्तिचित्रे, मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला- (जळणाऱ्या ताज हॉटेलवर आपले अश्रू वाहून आग शांत करणाऱ्या श्रद्धांजली प्रतिक असलेल्या मेणबत्या), प्रत्यक्ष निसर्गचित्र, सामाजिक प्रश्नावर आधारीत चित्रे त्यांनी तैलरंग, जलरंग, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगीत पेन्सिल, पेस्टल कलर या माध्यमात चित्रे साकारली आहेत.

Web Title: drawings of outdated sports will be displayed in exhibition organised in belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.