कन्नड घाटात दुचाकीस्वारांची जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:14 PM2017-09-07T16:14:05+5:302017-09-07T16:20:45+5:30

रस्ता खचल्याने चाळीसगाव व कन्नड या दोन तालुक्यांचा तुटला संर्पक तुटला

Death-threatening exercise of two-wheeler in Kannada ghats | कन्नड घाटात दुचाकीस्वारांची जीवघेणी कसरत

कन्नड घाटात दुचाकीस्वारांची जीवघेणी कसरत

Next
ठळक मुद्देदुचाकीस्वार जीव धोक्यात घालून करताहेत प्रवास.चाळीसगाव आणि कन्नड या दोन तालुक्यांचा तुटला संपर्क१५ दिवसानंतरही रस्ता खचल्याने परिस्थिती जैसे थे

आॅनलाईन लोकमत

चाळीसगाव दि.७ - गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरी देखील दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

गेल्या पंधरा दिवसापुर्वी मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातील रस्ता दोन ते तीन ठिकाणी खचला. दरडही कोसळल्याने घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र दुचाकीस्वार जीव धोक्यात घालत याच रस्त्यावरुन प्रवास करीत आहे. चाळीसगाव आणि कन्नड या दोन तालुक्यातील संपर्क रस्ता खचल्याने तुटला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक नांदगाव आणि नागद मार्गे वळविण्यात आली आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.  दुचाकीसह चारचाकी वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांसमोर दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करीत असताना पोलीस कर्मचारी हटकत नसल्याचे चित्र आहे. नांदगाव आणि नागदमार्गे कन्नड येथे जाण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यानेच दुचाकीस्वार जिव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Death-threatening exercise of two-wheeler in Kannada ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.