जळगावात नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:09 PM2018-04-17T19:09:00+5:302018-04-17T19:09:00+5:30

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनपामध्ये कुणीही फिरकेना

Councilors see the election of Jalgaon in Jalgaon | जळगावात नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध

जळगावात नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभाग रचनेत अनेकांचे जुने प्रभाग फुटले आहेत.प्रभाग रचनेची व्याप्ती पाहता उमेदवारांना करावी लागणार निवडून येण्यासाठी कसरतनगरसेवक आपआपल्या प्रभागातच व्यस्त

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१७ : मनपा निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांसह महापौर, सभागृह नेत्यांसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी मनपाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. नगरसेवक आपआपल्या प्रभागातच व्यस्त असून आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.
प्रभाग रचनेत अनेकांचे जुने प्रभाग फुटले आहेत. तर काहींच्या प्रभागांमध्ये इतर प्रभागांचा भाग जोडला गेल्याने दिग्गजांसह अनेक विद्यमान नगरसेवकांचे समीकरण बिघडले आहे. त्यातच प्रभाग रचनेची व्याप्ती पाहता सर्वच उमेदवारांना निवडून येण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे नेहमी मनपा इमारतीत डेरेदाखल असणारे नगरसेवक व पदाधिकाºयांनी सध्या मनपाकडे दुर्लक्ष करून आपले लक्ष केवळ प्रभागांमध्येच केंद्रीय केलेले दिसून येत आहे. त्यामुळे मनपात शुकशुकाट पहायला मिळत आहे.

Web Title: Councilors see the election of Jalgaon in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.