बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:42 AM2017-11-13T11:42:38+5:302017-11-13T11:44:01+5:30

हमी भाव वाढविण्याची होतेय मागणी

cotton producers earn Rs 47 per day: Government's neglect | बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

बागायती कापूस उत्पादक कमावतोय ४७ रूपये रोज: शासनाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्दे शेतमजुरापेक्षाही परिस्थिती बिकटहमीभावाअभावी व्यापाºयांकडून लूटस्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

सुशील देवकर
जळगाव: खते, बियाणे, मजुरी, ठिबक,कीटक नाशके आदीचा मोठ्या प्रमाणावर खर्च व तुलनेने मिळणारा कमी हमीभाव यामुळे बागायती कापूस उत्पादकाला जेमते ४७ रूपये रोज पडेल इतकेच उत्पन्न मिळत आहे. शेतमजूर देखील २०० रूपये रोज कमवीत असताना बळीराजाची अवस्था त्याहून बिकट झाली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
शेतकºयाला चांगला हमी भाव देण्यास शासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत आली आहे. स्वामीनाथ आयोगाने उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली आहे. असे असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे बळीराजा व्यापाºयांकडून नागवला जात आहे. पडत्या भावाला माल खरेदी करायचा आणि परप्रांतात नेऊन जास्त भावाने विकून रग्गड पैसा कमवायचे उद्योग सुरू आहेत. त्यातच शेतकरी कर्जबाजारी झाला तर कशाला हवी कर्जमाफी? असे प्रश्न शेतीतील ओ-की-ठो कळत नसलेल्यांनी करावेत, असा दुर्देवाचा फेरा शेतकºयांच्या नशिबी आला आहे.
असा होतो खर्च
कापूस उत्पादकांचा होणार एकरी खर्चच एका शेतकºयाने सविस्तर मांडून मिळणारे उत्पन्न व त्यातून कापूस उत्पादक शेतकºयाला पडणारा रोज याचा ताळेबंदच सोशल मिडियावर टाकला आहे, त्याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. त्यात बागायती कापूस उत्पादकाला एका एकरला नांगरणीसाठी १००० रूपये, रोटाव्हेटर १००० रूपये खर्च येतो. ठिबकची किंमत किमान १५००० रूपये आहे. ते किमान तीन वर्ष टिकते. म्हणजेच वर्षाला ५ हजार रूपये खर्च येतो. सरी काढण्याची मजुरी ५०० रूपये, ठिबक बसविण्याची मजुरी १००० रूपये, बियाणे २ पाकीटे २ हजार रूपये, पेरणी मजुरी १ हजार रूपये, खतांसाठीपेरणीवेळी १ बॅग, पेरणीनंतर १ महिन्याने १ बॅग, माल धरण्यापूर्वी १ बॅग याप्रमाणे २७०० रूपये व टाकण्याचा खर्च २०० रूपये प्रमाणे ६०० रूपये असा एकूण ३ हजार रूपये खर्च येतो. कोळपणी किमान दोन वेळेचा खर्च २ हजार रूपये किमान एक खुरपणी १ हजार रूपये, किटकनाशकांच्या किमान ४ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एका फवारणीला हजार रूपये प्रमाणे ४ हजार रूपये खर्च येतो. जर निसर्गाच्या कृपेने कापूस उत्पादन चांगले आले तर जास्तीत जास्त एकरी १२ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यासाठी ७ रूपये किलो प्रमाणे वेचणीसाठी ८४०० रूपये इतकी मजुरी लागते. तर शेवटी शेतात उरलेले खुंट शेताबाहेर काढण्यासाठी १ हजार रूपये खर्च येतो. याप्रमाणे एकरी सुमारे ३० हजार ९०० म्हणजेच ३१ हजार रूपये खर्च येतो.
केवळ ४७ रूपये पडतो रोज
शासनाकडून ३५०० ते ४ हजार रूपये क्विंटल भाव दिला जात आहे. ४ हजार रूपये भाव धरला तरी १२ क्विंटलला म्हणजेच एकरी ४८००० रूपये उत्पन्न मिळते. त्यातून ३१ हजार रूपये खर्च वजा जाता शेतकºयाच्या हाती केवळ १७ हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच १४११ रूपये महिना किंवा ४७ रूपये रोज या शेतकºयाला पडतो. त्याव्यतिरिक्त विहिरीवरील पंपांचे वीजबिल, शेतकºयाची स्वत:ची मेहनत वेगळीच.

Web Title: cotton producers earn Rs 47 per day: Government's neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.