सभासदांच्या सत्कारावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:07 PM2019-06-24T12:07:55+5:302019-06-24T12:13:21+5:30

ग.स.सोसायटी : सहकार गटातील संचालकही बाहेर; पत्रकाराचा मोबाईल हिसकावून संचालकपुत्राकडून दमदाटी

Confusion over members' virtue | सभासदांच्या सत्कारावरुन गोंधळ

सभासदांच्या सत्कारावरुन गोंधळ

Next

जळगाव : ज्येष्ठ सभासदांना सत्कार सोहळ्यासाठी बोलावून फक्त मर्जीतील सभासदांचा सत्कार सोहळा करण्यात आल्याने इतर ज्येष्ठ सभासदांनी व्यासपीठावर धाव घेत संचालकांना जाब विचारला. त्यामुळे ग.स.सोसायटीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात गोंधळ उडाला. या प्रकाराचा ज्येष्ठ सभासदांनी निषेध करीत या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे सहकार गटातील संचालकही निघून गेले. सहकार राज्यमंत्री, जिल्ह्यातील खासदार व आमदारांसमोरच हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकारामुळे ग. स. तील अंतर्गंत गटातटाचे वातावरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
ग.स.सोसायटीच्यावतीने आदर्श शिक्षक, ज्येष्ठ सभासद व विविध परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. तर व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, ग. स.चे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, कर्ज समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्वास सुर्यवंशी, ग. स. प्रबोधनी अध्यक्ष सुभाष जाधव, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, संचालक उदय पाटील, नथ्थु पाटील, अजबसिंग पाटील, कैलासनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, सुनिल पाटील, भाईदास पाटील, सुनिल पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, यशवंत सपकाळे, रागिणी चव्हाण, विद्यादेवी पाटील, संजय पाटील, दिलीप चांगरे आदी उपस्थित होते.
अन् ज्येष्ठ सभासद झाले संतप्त
सुरुवातीला आदर्श शिक्षकांचा सत्कार झाला. यानंतर पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात येत होता. मध्येच मग गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला सुरुवात झाली. यामुळे आलेल्या काही सभासदांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. इतर सभासदांचा सत्त्कार केला, मग आमचा का नाही, अशा प्रश्नांचा भडीमार करीत संचालकांनी त्यांच्या मर्जीतील ज्येष्ठ सभासदांचा सत्कार केला व आम्हाला जाणूनबुजून डावलले असल्याचा आरोप केला.
अध्यक्ष व संचालकांनी आमचा अपमान केल्याचा आरोप या सभासदांनी केला. यावेळी इतर सदस्यांनींही व्यासपीठाकडे धाव घेतल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. व्यासपीठावरील काही संचालकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेले काही ज्येष्ठ सभासदांनी कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला.
पत्रकाराचा मोबाईल हिसकावुन संचालक पुत्राची दमदाटी
या गोंधळाचे मोबाईलमध्ये चित्रण करणाऱ्या एका पत्रकाराचा मोबाईल संचालकाच्या पुत्राने हिसकावत पत्रकाराला सभागृहाबाहेर नेऊन दमदाटी केली. मोबाईलमध्ये काढलेले सर्व फोटो डिलीट केले. या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध केला.
सोनवणे लोकसहकार गटात
ग. स. च्या गुणवंत सत्कार सोहळ्यात सहकार गटाचे संचालक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी लोकसहकार गटात प्रवेश केला.


सत्कार समारंभ हा संस्थेचा होता़ कुठल्याही गटाचा नव्हता़ तरीही पत्रिकेवर लोकसहकार गटाचा उल्लेख होता़ शिवाय कार्यक्रम कधी होणार, याबाबत आम्हाला कसलीही माहिती देण्यात आली नाही़ त्यामुळे सुरूवातीला या कार्यक्रमावर बहिष्काराचा आमचा पवित्रा होता़ मात्र, कार्यक्रमाला येणाºया मान्यवरांचा हा अनादर होईल तसेच सभासद पाल्यांसाठी आम्ही आमची भूमिका बदलून कार्यक्रमाला हजेरी लावली़ साडेदहा वाजेच्या कार्यक्रमाला उशिरा सुरूवात झाली़ त्यात काही ठराविक निमंत्रिकांचे सत्कार झाले मात्र, काहीचें सत्कार न झाल्याने शिवाय विलंब होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़ गोंधळ वाढला व थेट भांडणापर्यंत हा प्रकार गेला़ -उदय पाटील, गटनेते सहकार गट


सभासदांचा सत्कार झाला. यात काही सभासदांचा सत्कार राहून गेला. त्यामुळे यापैकी एकाच सभासदाने विचारणा केली. त्यावरुन थोडा गोंधळ उडाला. आमंत्रण पत्रिकेवर सर्व संचालकांची नावे घेतली आहेत.
-मनोज पाटील, अध्यक्ष, ग.स.सोसायटी.

Web Title: Confusion over members' virtue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.