मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:53 AM2019-03-16T11:53:38+5:302019-03-16T11:54:35+5:30

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

Circle officers abducted Tahsildars | मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारांना शिवीगाळ

मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारांना शिवीगाळ

Next
ठळक मुद्देनिलंबनाची मागणी 



पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे यांनी सलग दोन दिवस दारूच्या नशेत निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांना शिवीगाळ केली. संबधित कर्मचाऱ्यास निलंवित करावे अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ, छावा संघटना व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार ए.बी गवांदे यांना दिले.
मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे हे मागील वर्षभरापासून आपल्या कामात दिरंगाई करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी तहसीलदार पदभार असताना आताचे निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग येऊन १४ रोजी सायंकाळी कार्यालयात शिंदे यांनी मद्यप्राशन करीत पंकज पाटील यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. याबाबत पंकज पाटील यांनी वरिष्ठांना माहिती दिली.
दुसºया दिवशी १५ रोजी याच शिंदे यांनी तहसील कार्यालयातच मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील, प्रताप पाटील हे उभे असताना त्यांच्यासमोर पंकज पाटील यांना पुन्हा शिवीगाळ करीत धमकी दिली. मी जातीवाचक गुन्हा दाखल करेल असे सांगत पळ काढला. यावेळी काही कर्मचाºयांनी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना बोलविले. पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी व मराठा सेवा संघटना, छावा संघटने कडून कारवाई बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी अनिल पाटील बी.टी.पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Circle officers abducted Tahsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.