बोदवड येथे मोहरमनिमित्त सवाऱ्याची शतकी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:13 PM2018-09-17T21:13:28+5:302018-09-17T21:15:30+5:30

हिंदूंच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० सवाºया

Century tradition of the Muharram ridden in Bodwad | बोदवड येथे मोहरमनिमित्त सवाऱ्याची शतकी परंपरा

बोदवड येथे मोहरमनिमित्त सवाऱ्याची शतकी परंपरा

googlenewsNext
ठळक मुद्देदोनशेवर सवाºया बसतात शहरात ठिकठिकाणीबोदवड शहरात उच्च शिक्षित भगत मंडळी१८ रोजी मिरवणूक, २० रोजी कत्तलची रात्र, तर २१ रोजी ताजिया मिरवणुकीने उत्सवाचा समारोपचार दिवसात होते लाखोंची उलाढाल




बोदवड, जि.जळगाव : मुस्लीम बांधवांच्या मोहरम महिन्याची सात तारीख अर्थात १८ सप्टेंबरपासून मोहरम सणाला सुरुवात होत आहे. चार दिवसीय शतकी परंपरा असलेल्या मोहरमच्या सवाºया बसवण्याची बोदवड येथे परंपरा आहे. या सवाºया म्हणजेच (छडी) सजवलेल्या छडी ह्या शहरात ठिकठिकाणी सजवलेल्या मांडवात बसवलेल्या असतात. त्या छडीला चांदीचा नाल, चांदीची छत्री, कापडाची चादर, फुलांच्या झालरने सजवून चौरंगवर बसवलेले असते.
अभिर, अत्तर, लोभानच्या सुगंधाने हा परिसर सुवासिक झालेला असतो, तर बसवलेल्या सवाºयांची मिरवणूक त्यांची मिरवणूक सवाद्य भगत मंडळी एकत्र दोन चारच्या संख्येने एकत्र येऊन सवाद्य शहरातून काढतात. मोहरमनिमित्त बसवण्यात येणाºया सवाºयांची मिरवणूक पाहण्यासाठी बोदवडसह खान्देश, विदर्भ व मध्य प्रदेशातील बºहाणपूर, सुरत, मलकापूर, मुंबई येथील भाविक येत असतात. यासाठी या चार दिवसात शहरात जणू जत्राच भरलेली असते.
मोहरमनिमित्त बसणाºया सवाºयाची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. अनेक भाविक नवस मानतात व नवस फेडण्यासाठी चांदीचा नाल, खोपरा वाटी तसेच चादर, अत्तर, फुल, लोभान, अभिर या वस्तू चढवत असतात. त्यामळे या वस्तूची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यासाठी शेकडो टन फुल विक्रीसाठी बोदवड शहरात येत असतात. यासाठी बाजारपेठ सजलेली असते. या वस्तूंमुळे कापड व्यावसायिक, फुलहार विक्रेते याना रोजगार मिळतो. सुमारे दोनशे सवाºयांमागे वाजंत्री मंडळी असा एक सवारी (छडी) मागे भगत मंडळींसह १५ जणांचा गोतावळा असतो.
१८ रोजी या सवाºया बसवल्या जातात. चार दिवस चालणाºया या उत्सवात १८ रोजी मिरवणूक, २० रोजी कत्तलची रात्र, तर २१ रोजी ताजिया मिरवणुकीने उत्सवाचा समारोप होईल.
बोदवड शहरात बसणाºया सवाºयांची रीतसर नोंदणी पोलीस प्रशासन करते. गत वर्षी शासकीय आकडेवारीनुसार १६० सवाºया बसवण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक शंभर सवाºया ह्या हिंदू बांधवांच्या होत्या.
शहरात ठिकठिकाणी मांडव करून बसविण्यात येणाºया सवाºयांच्या भगत मंडळींमध्ये काही वकील, तर काही शिक्षक तर काही शासकीय नोकरदार भगत आहे.
काही मानाच्या सवाºया व त्यांचे भगत
सलाम भगत (दुले कासम), भास्कर भगत (सिद्धी चांदशा वली) गोपाल गुरुजी (सिद्धी मस्तान वली) मनोहर भगत कंडक्टर (दिलेर चांदशा), बुना भगत (कमल शावली) सुरज भगत, नाना भगत, अमीर भगत,जगू भगत, सुभान भगत, बुºहानोद्दीन वली, गजू भगत, अमृत भगत, नईम शा, आकाश भगत, राहुल भगत, सैलानी पीर, गुलाबशा असे भगत आहेत.
१८ पासून संदल मिरवणुकीने या उत्सवाला सुरवात होत आहे. गणेशोत्सव व मोहरमच्या सवाºयानिमित शहरात पाहुणे मंडळींची गर्दी होत असते, तर सवाºयांची मिरवणूक पाहण्यासाठी रस्ते चौक गजबजलेले असतात. या चार दिवसात लाखोंची उलाढाल होत असते.





 

Web Title: Century tradition of the Muharram ridden in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.