प्रवाशाच्या ४० लाख रोकडच्या बॅगेचा सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:02 AM2019-05-22T01:02:04+5:302019-05-22T01:02:55+5:30

जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला.

The CCTV footage of the 40 lakh cash bag of the passenger was investigated | प्रवाशाच्या ४० लाख रोकडच्या बॅगेचा सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास

प्रवाशाच्या ४० लाख रोकडच्या बॅगेचा सीसीटीव्ही फुटेजमुळे तपास

Next
ठळक मुद्देभुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरीरेल्वे पोलिसांनी बॅग दिली आयकर विभागाच्या ताब्यातपोलीस पोहोचले वºहाडाकडे

भुसावळ, जि.जळगाव : जबलपूर येथून १२१६८ अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेस या गाडीने मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाची बॅग भुसावळ येथे उतरलेल्या लग्न वºहाड्याजवळ सापडली आहे. स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून त्वरित तपास लागला. मात्र हरवलेल्या बॅगेत आढळलेल्या ४० लाख रकमेबाबत भुसावळ रेल्वे पोलिसांनी नाशिक आयकर विभागाला कळविले आहे.
वाराणसी- मुंबई एक्सप्रेसने १६ मे रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राहुल जगदीश गोस्वामी (वय २१, रा.करमचंद चौक, जबलपूर) हा मुंबई येथे जाण्याकरिता साधारण तिकीट काढून आरक्षित डब्यात बसला होता. डबा क्रमांक एस-४, शिट क्रमांक ३३ वरून प्रवास करताना तोे ३९ लाख ९८ हजार रुपये रोकड असलेली काळ्या रंगाची सॅक बॅग शिटखाली ठेवून झोपला.
दरम्यान, राहुलला १७ मे रोजी पहाटे मनमाडजवळ जाग आली. त्याने शिटखाली ठेवलेली बॅग पाहिली, परंतु त्याला ती दिसली नाही म्हणून त्याने त्वरित आजूबाजूच्या प्रवाशांकडे चौकशी केली. प्रवाशांनी सांगितले की, जबलपूर येथून लग्नाचे वºहाडी याच डब्यातून प्रवास करीत होते व ते सर्व भुसावळात उतरले आहे. चुकून ती बॅग लग्न वºहाडी लोकांनी उतरवली असावी, असा अंदाज व्यक्त केला. यावरून राहुल गोस्वामी हा भुसावळ येथे दि.१८ मे रोजी आला व त्याने सर्व हकीकत रेल्वे पोलिसांना सांगितली. त्यावरून भुसावळ रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील १७ मे रोजीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले व त्यावरून वाराणसी एक्सप्रेस गाडीच्या डबा क्रमांक एस ४ मधून लग्नाचे वºहाडी यात काही महिला, पुरुष, मुली असे प्रवासी उतरले होते. त्यांच्यापैकी एका मुलीजवळ राहुल गोस्वामी याने सांगितलेल्या वर्णनाची काळ्या रंगाची सॅक बॅग दिसली. हे सर्व प्रवासी वाहन क्रमांक एमएच ४६ एएक्स ७१९ ने गडकरी नगर भुसावळ येथे गेल्याचे समजले. त्यावरुन रेल्वे पोलीस अधिकारी हे सहकारी पोलिसांसह हॉटेल व्यावसायिक निर्मल सत्यनारायण पिल्ले (वय ३८) रा.खडका रोड, भुसावळ येथे गेले व सदर घटनेची सर्व माहिती दिली. यावेळी पिल्ले यांनी सांगितले की, जबलपूर येथे लग्नाला गेलो होतो. तेथून १६ मे रोजी गाडी क्रमांक १२१६८अप वाराणसी-मुंबई एक्सप्रेसच्या डब्यात आरक्षण असल्याने सर्व नातेवाईक मुलांसह १७ मे रोजी भुसावळ येथे उतरलो. तेव्हा सामान जास्त होते म्हणून सर्वांनी मिळून बॅगा घेतल्या व स्थानकाबाहेर आलो व १७ सीटर ट्रॅव्हल्स गाडीने गडकरी नगर येथे घरी आलो. घरात पॉट माळ्यावर ठेवलेल्या बॅगा दाखविल्या. तेव्हा गोस्वामी यांनी सांगितलेल्या वर्णनाची बॅग दिसून आली. ही बॅग पिल्ले यांनी पोलिसात हजर केली.तेव्हा २ पंचासमोर पंचनामा केला. त्यात ३९ लाख ९८ हजार रुपये मिळून आले. ही रक्कम चौकशी करून शहनिशा करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रेल्वे पोलिसात दि.१८ मे रोजी क्रमांक ०३२/१९ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. राहुल जगदीश गोस्वामी यांस चौकशीकरिता २० मे रोजी समन्स बजावण्यात आला होता. सदर कारवाई भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी, एएसआय मधुकर न्हावकर, सुनील पाटील, सुनील इंगळे, आनंदा सरोदे, अजित तडवी, जगदीश ठाकूर, शैलेश ठाकूर, पांडुरंग वसू आदींनी केली.

Web Title: The CCTV footage of the 40 lakh cash bag of the passenger was investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.