ठिबकच्या दुकानात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 03:52 PM2019-05-16T15:52:14+5:302019-05-16T15:52:53+5:30

भडगाव येथील घटना

Brave stolen in a drip shop | ठिबकच्या दुकानात धाडसी चोरी

ठिबकच्या दुकानात धाडसी चोरी

Next


भडगाव : शहरातील एका ठिबकच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलुप तोडून टाक्या, ठिबकचे बंडल यासह एकूण ४४ हजार ५०० रुपयाचे साहित्य लांबविल्याची घटना १४ ते १५ दरम्यान, सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, शहरातील श्री साईदत्त ठिबक दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून ४ पाण्याच्या टाक्या १२ हजार रुपये किमतीच्या, ५०० रुपये किमतीच्या प्लॅस्टीक खूर्ची, ठिबक नळयांचे ३२ हजार रुपये किमतीचे १० बंडल असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांच्या वस्तु लांबवून पलायन केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला दुकानमालक अमोल रामकृष्ण पाटील रा. निंभोरा ता. भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पगारे हे करीत आहेत.

Web Title: Brave stolen in a drip shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.