काँंग्रेससह भाजपाला आंतरमशागतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:39 AM2019-03-24T11:39:03+5:302019-03-24T11:40:33+5:30

तालुका वार्तापत्र : बोदवड

The BJP needs inter-governmental progress including the Congress | काँंग्रेससह भाजपाला आंतरमशागतीची गरज

काँंग्रेससह भाजपाला आंतरमशागतीची गरज

Next
ठळक मुद्देनिवडणूकपूर्व हालचाली गतिमान : बहुतांश ठिकाणी भाजपाचे वर्चस्व


बोदवड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोदवड तालुक्यामध्ये बैठका आणि राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. आगामी काळात बोदवड तालुक्यातील वर्चस्वासाठी काँग्रेससह भाजपाला आंतर मशागतीची गरज भासणार आहे.
बोदवड तालुक्यात जि.प.चे दोन गट तर चार गण आहेत. सन २०१४ मध्ये जिल्हा परिषदेच्या शेलवड गटात राष्ट्रवादीचे तर नाडगाव गटात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. आज घडीला घड्याळाचे काटे पूर्ण फिरून दोन्ही गट व चारही गणात भाजप ने वर्चस्व प्रस्तापित केले आहे. अंतर्गत कलहामुळे अनेक वेळा पक्षाच्या बैठकीत वाद झाले. बूथ निहाय बैठकीचे माहिती पत्रक वेळेवर मिळाले नाही, कधी कामगिरीची आकडेमोड जुळली नसल्याने स्वत: पक्षनेत्यांसमोर हा वाद उफाळून आला होता. कधी पक्षाच्या बैठकीत जेवणाच्या ताटावरून वाद झाले तर वर्गणी करून जेवण दिले या तक्रारी सुद्धा नेत्यापर्यंत पोहचल्या होत्या.
दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्याची गरज आहे. राष्ट्रवादीने ही नगरपंचायतीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र सेनेने आमदारकीत तालुक्यातून सर्वधिक मतदान घेतले होते. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांना आता जमिनीवर येऊन परिश्रम घ्यावे लागणार अशी परिस्थिती आहे. भाजपने विकास कामाची पुस्तिका तालुक्यात घरोघर पोहचवित प्रचार आघाडी सुरू केली आहे. पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीला सुरवात ही झाली आहे. आता रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पक्षीय बलाबल
बोदवड नगरपंचायती वर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यात सतरा नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक भाजपाचे तर एक सेनेचा आहे. त्याचे पाठबळ भाजपला आहे. काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे चार, तर राष्ट्रवादीला पाठींबा असलेले दोन अपक्ष असे समीकरण आहे.
पंचायत समितीच्या चार ही गणांमध्ये भाजप तर जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटात भाजपचे सदस्य आहे, अशी स्थिती तालुक्यात आहे.

Web Title: The BJP needs inter-governmental progress including the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.