जळगावात महापालिकेच्या गाळ्यांची वर्गवारीनुसार किंमत ठरवून ऑनलाईन लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:24 PM2018-01-07T12:24:43+5:302018-01-07T12:27:01+5:30

जिल्हाधिकारी

Auctioning and online auction market shop | जळगावात महापालिकेच्या गाळ्यांची वर्गवारीनुसार किंमत ठरवून ऑनलाईन लिलाव करणार

जळगावात महापालिकेच्या गाळ्यांची वर्गवारीनुसार किंमत ठरवून ऑनलाईन लिलाव करणार

googlenewsNext
ठळक मुद्देकमी उत्पन्न गटांतील व्यापा:यांवर नाही बोझारेडीरेकनरनुसार दर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07- शहरातील मनपाच्या ताब्यातील 20 मार्केटमधील 2387 गाळ्य़ांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आहे. कोणावरही अन्याय अथवा नाराजी होऊ नये म्हणून गाळ्य़ांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार असून वर्गवारीनुसार गाळ्य़ांची किंमत ठरविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी मनपाच्या विविध कामांविषयी माहिती दिली. 

रेडीरेकनरनुसार दर
गाळ्य़ांसंदर्भात मनपाने यापूर्वीच ठराव करून पाच पट दंड व दोन टक्के  रेडीरेकनरचा दर आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गाळ्य़ांची किंमत मोठय़ा प्रमाणात वाढते. मात्र कमी उत्त्पन्न गटातील गाळेधारकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांचे दर इतर गाळ्य़ांपेक्षा कमी ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले. 
गाळ्य़ांचा लिलाव करीत असताना एकाने जी बोली लावली त्याविरोधात त्याचा प्रतिस्पर्धी जास्त बोली लावेल व त्यामुळे कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून गाळ्य़ांचा ऑनलाईन लिलाल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘वन टाईम सेटलमेंट’ने मनपा कजर्मुक्त करणार
हुडको कर्जासंदर्भातदेखील मनपाला दिलासा देणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सध्या डीआरएटीमध्ये कामकाज असून 11 रोजी यावर निकाल असून त्यात वनटाईम सेटलमेंट करून मनपाला कजर्मुक्त करण्याचा मनोदय जिल्हाधिका:यांनी व्यक्त केला. 

जळगावला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर शहर बनविणार
 शहर स्वच्छ, सुंदर असेल तर नागरीकांचे आरोग्यही चांगले राहते. जळगाव हे देशातील महत्त्वपूर्ण शहर असल्याने या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वोतोपरी प्रय} सुरु असून यावर्षी जळगावला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ व सुंदर शहर बनविणार असल्याचा संकल्प जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.

 25 कोटींबाबत लवकरच निर्णय
जळगाव शहरात मुलभूत सोईसुविधांसाठी  25 कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


मलनिस्सारण योजनेसाठी 138 कोटी रुपयांचा प्रस्ताव
अमृत मलनिस्सारण योजनेसाठी 138 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिका:यांनी दिली. 

वर्षभरात शहरात दररोज पाणीपुरवठा
अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 249  कोटी रुपये मंजूर झाले आहे. शहराला पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी   येत्या वर्षभरात जळगावकराना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रय} करणार असल्यचा मनोदय जिल्हाधिका:यांनी व्यक्त केला. 

स्वच्छतेसाठी 30 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार
शहरात मध्यंतरी मोठय़ा प्रमाणात डेंग्यू व इतर आजार पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता स्वच्छतेचा प्रश्न बराच नियंत्रणात आला असला तरी यात आणखी सुधारणा करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यासाठी शहराच्या स्वच्छतेसाठी 30 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कच:यासाठी घंटागाडय़ा खरेदी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

मनपा आयुक्त लवकरच येणार
नवीन मनपा आयुक्त येणार अशी चर्चा आहे, ते कधी येतील असा प्रश्न जिल्हाधिका:यांना विचारला असता ते म्हणाले, मनपा आयुक्त म्हणून किशोर बोर्डे लवकरच येतील, असे त्यांनी सांगितले.  उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले.

इतर महत्त्वाच्या घोषणा

-  ट्रॉफीक गार्डनचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण करणार
- भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानापाठोपाठ इतर उद्यानांचे खाजगी संस्था, व्यक्तींकडून सुशोभिकरण करणार 

-  महापालिकेची एक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करुन त्यामध्ये सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची सोय करणार
-  शहरातील मालमत्तांचे सॅटेलाईटद्वारे मॅपिंग केल्यामुळे मनापाचे उत्पन्न 140 कोटी रुपयांनी वाढणार.

- शहरातील बंदिस्त नाटय़गृहाच्या 30 कोटी रुपये खर्चाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण, अंतर्गत रंगकाम व इतर कामे प्रगतीपथावर. जानेवारी अखेर नाटय़गृह खुले होणार 

- जळगाव येथे मेडिकल हबला मान्यता मिळाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एप्रिल 2018 पासून प्रवेश सुरु. महाविद्यालयासाठी चिंचोली शिवारात 100 एकर जमीन. 

-    जळगाव येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम करणे

- भुसावळ नगरपालिकेला अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 90.84  कोटी रुपये मंजूर असून योजनेचे भूमिपूजन झाले. 
 

Web Title: Auctioning and online auction market shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.