चाळीसगावात छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:44 PM2019-01-09T16:44:21+5:302019-01-09T16:46:08+5:30

चाळीसगाव , जि.जळगाव : येथील शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी ...

Announcing the executive committee of Chhatrapati Shahu Maharaj Samaj Vikas Mandal in Chalisgaon | चाळीसगावात छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

चाळीसगावात छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Next
ठळक मुद्देअध्यक्षपदी रमेश चव्हाणशाहू महाराज मराठा समाजाचे भव्य असे मंगल कार्यालय निर्माण करण्याचा मनोदयसमाजातील जास्तीत जास्त तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील

चाळीसगाव, जि.जळगाव : येथील शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश विक्रम चव्हाण यांची तर सचिवपदी अ‍ॅड.प्रमोद सुखदेव एरंडे यांची निवड समाजाच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये करण्यात आली.
कार्यकारणी सदस्य म्हणून विलास आनंदराव दुशिंग कार्याध्यक्ष, महादू चिंधा पागे उपाध्यक्ष, अविनाश करपे उपाध्यक्ष, अण्णा कृष्णा धुमाळ सहसचिव प्रदीप बारकू काळे खजिनदार, तर भाऊसाहेब खंडू जाधव, धनंजय सुखदेव मांडोळे, वैभव पंडित गवारे, बापू नारायण नवले, पंढरीनाथ सकाराम पांगारे, बाळकृष्ण शंकर भवर, रामलाल काशिनाथ शिंदे, आबा मधुकर गायके, किरण भीमराव शेळके, सुनील धनराज निकुंभ, राजू श्रावण पवार, किशोर भास्कर शिंगटे, नामदेव काशिनाथ हुजरे, दिलीप विठ्ठल सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आह.े
शाहू महाराज मराठा समाजाचे भव्य असे मंगल कार्यालय निर्माण करण्याचा मनोदय यावेळी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी केला. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील राहील, असेही यावेळी सांगण्यात आले

Web Title: Announcing the executive committee of Chhatrapati Shahu Maharaj Samaj Vikas Mandal in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.