विदगावजवळ आमोद्याचा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:32 AM2017-04-12T00:32:30+5:302017-04-12T00:32:30+5:30

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोकुळ सपकाळे हे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

Amodia's biker killed in Vidgaon | विदगावजवळ आमोद्याचा दुचाकीस्वार ठार

विदगावजवळ आमोद्याचा दुचाकीस्वार ठार

Next

जळगाव : सासरवाडी येथून दशक्रियेचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गोकुळ त्र्यंबक सपकाळे (वय 45 रा.आमोदे खुर्द, ता.जळगाव) हे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात विदगाव पुलाजवळ झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सपकाळे हे मासे विक्रीचा व्यवसाय करायचे. मंगळवारी पुनगाव या सासरवाडीच्या गावाहून दशक्रिया विधी आटोपून परत येत असताना इदगाव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.19 ए.बी.5329) अज्ञात वाहनाने धडक दिली.
 तळपत्या उन्हात सपकाळे रस्त्यावर पडल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
अपघाताची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण व माजी जि.प.सदस्य विलास सोनवणे यांनीही जिल्हा रुग्णालय गाठले. सपकाळे यांच्या पश्चात प}ी व 4 भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Amodia's biker killed in Vidgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.