भाचीच्या लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला चाकूचा धाक दाखवून जळगावात लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:44 PM2018-04-23T22:44:25+5:302018-04-23T22:44:25+5:30

अमळनेर येथून भाचीच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या लिलावती विनायकराव सोनवणे (वय ६५,रा.बालाजीपुरा, अमळनेर) या वृध्देला रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून ६८ हजाराचे दागिने लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amalner's elderly man stabbed to death | भाचीच्या लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला चाकूचा धाक दाखवून जळगावात लुटले

भाचीच्या लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला चाकूचा धाक दाखवून जळगावात लुटले

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षा चालकाचा प्रताप  लुटल्यानंतर महामार्गावर सोडलेगुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२३ : अमळनेर येथून भाचीच्या लग्नासाठी जळगावात आलेल्या लिलावती विनायकराव सोनवणे (वय ६५,रा.बालाजीपुरा, अमळनेर) या वृध्देला रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून ६८ हजाराचे दागिने लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लिलावती सोनवणे यांचे भाऊ सुनील डिंगबर पाटील हे शहरातील रामपेठेत राहतात. त्यांच्या मुलीचे २४ एप्रिल रोजी लग्न असल्याने लिलावती सोनवणे या अमळनेर येथून साडे सात वाजता जळगावला येण्यासाठी निघाल्या. बसस्थानकावर रात्री ९.१५ वाजता उतरल्यानंतर त्या चालतच पांडे चौकाकडून घरी जात असताना पेट्रोल पंपाजवळ एक मजबूत शरीरयष्टी व गोºया रंगाचा रिक्षावाला त्यांच्याजवळ आला. आजी रिक्षात बसा, मी तुम्हाला घरी सोडून देतो असे सांगून रिक्षात बसण्यासाठी आग्रह करीत होता. घर जवळच असल्याने मी चालत जाते असे सांगून लिलाबाई यांनी रिक्षात बसण्यास नकार दिला असता त्याने कमी पैसे द्या, मी तुम्हाला सोडतो असे सांगून रिक्षात बसविले.


महामार्गावर फिरवली रिक्षा
रिक्षा चालकाने लिलावती सोनवणे यांना पंचमुखी हनुमान मंदिराकडे नेले असता त्यांनी माझे घर इकडे नाही असे सांगितले. त्यावर त्याने डिझेल टाकायचे आहे असे सांगून रिक्षा इच्छादेवीमार्गे भुसावळ रस्त्यावर नेली. तेथे मोकळ्या जागेत थांबवून लिलाबाई यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील दागिने, आठशे रुपये रोख, एक हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज हिसकावून घेतला.

Web Title: Amalner's elderly man stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.