ताडीसह देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना कारवाईची किक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 03:24 PM2023-12-30T15:24:36+5:302023-12-30T15:24:44+5:30

जळगाव, पाचोरा, चोपड्यात ‘एक्साईज’च्या धाडी, अवैधपणे हा साठा विक्री करणाऱ्या १४ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटकही केली आहे.

Action on local and foreign liquor sellers including toddy; 6 lakh worth of goods seized | ताडीसह देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना कारवाईची किक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताडीसह देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना कारवाईची किक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुंदन पाटील

जळगाव : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४ जणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

३१ डिसेंबरनिमित्त बनावटसह अवैधपणे मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता दाखवित शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत कारवाई सत्र राबविले. त्यात पाचोरा, चोपडा, जळगाव परिसरातून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दारुसह ताडीचे ‘पाऊच’ही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहेत. अवैधपणे हा साठा विक्री करणाऱ्या १४ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटकही केली आहे.

चौघा तळीरामांना दंडाची झिंग
दरम्यान, तरसोद शिवारातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या ४ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित राजेंद्र चव्हाण, नवल अजयपाल जाधव, अक्षय संजय चव्हाण, प्रशांत दत्तू पाटील (जळगाव) अशी चौघांची नावे आहेत. 

‘ताडी’चा प्रवास रोखला
एका कारने ताडीने भरलेले ‘पाऊच’ वाहून नेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १०० पाऊचसह वाहन जप्त करण्यात आले आहे.

एरंडोलमध्येही कारवाई
जळगाव, पाचोरा, चोपडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी एरंडोल तालुक्यातील अवैध मद्यविक्री करणाऱ्या व विनापरवाना दारूच्या दारु पिणाऱ्या १७ आरोपींवर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली. १२ मदयपींना ४ गुन्हयांमध्ये एरंडोल येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 300 रुपयांचा दंड ठोठावला.

महामार्गावर तपासणी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी रात्री महामार्गावर वाहनांची अचानक तपासणी सुरु केली. रात्रभरात कुठेही दारुची तस्करी करणारे वाहन आढळून आलेले नाही.

Web Title: Action on local and foreign liquor sellers including toddy; 6 lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.