चोपडा शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:56 PM2019-02-13T23:56:14+5:302019-02-13T23:57:10+5:30

अडीच लाखाचा ऐवज जप्त

Action on illegal sand transit tractor in Chopda city | चोपडा शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

चोपडा शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Next

चोपडा - येथील धनवाडी रस्त्यावर रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेत मालकावर गुन्हा दाखल केला. त्यात अडीच लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ट्रॅक्टरमध्ये पाच हजार रुपयांची वाळू विनापरवाना उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक करताना आढळून आल्याने गोरगावले मंडलाधिकारी रवींद्र जगन्नाथ बेलदार यांच्या फियार्दीवरून १३ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गोपाल पांडुरंग बाविस्कर रा.चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात २ लाख ५० हजाराचे ट्रॅक्टर व हजाराची वाळू असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनार हे करीत आहेत.

Web Title: Action on illegal sand transit tractor in Chopda city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव