अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:16 AM2021-05-23T04:16:26+5:302021-05-23T04:16:26+5:30

============== रेल्वेखाली येऊन प्रौढाचा मृत्यू जळगाव : भादली ते भुसावळ डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी प्रौढाचा मृत्यू ...

Accidental death | अपघातातील जखमीचा मृत्यू

अपघातातील जखमीचा मृत्यू

Next

==============

रेल्वेखाली येऊन प्रौढाचा मृत्यू

जळगाव : भादली ते भुसावळ डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना २० मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास राजेंद्र साळुंके करीत आहेत.

==============

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : साकेगावाजवळ भरधाव डंपरने कारला धडक दिली होती. ही घटना १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती. या अपघातात कारचालक नीरज रामचंद्र कोल्हे (२७, रा. योगेश्वर नगर) हे गंभीर जखमी झाले होते. उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नशिराबाद पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार एमएच.१९.सीवाय.२२८० क्रमांक असलेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

==============

फूस लावून पळून नेले

जळगाव : सावखेडा शिवारातील वाघनगर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: Accidental death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.