जळगाव जिल्ह्यातील 65 हजारावर शेतक-यांचे अर्ज नामंजूर, त्रुटी दूर करण्याची मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:22 PM2017-10-26T12:22:02+5:302017-10-26T13:04:44+5:30

चार लाख 97 हजार शेतकरी अंशत: पात्र

65 thousand in Jalgaon district, the application for rejecting the application of the farmer, the opportunity to get rid of the error | जळगाव जिल्ह्यातील 65 हजारावर शेतक-यांचे अर्ज नामंजूर, त्रुटी दूर करण्याची मिळणार संधी

जळगाव जिल्ह्यातील 65 हजारावर शेतक-यांचे अर्ज नामंजूर, त्रुटी दूर करण्याची मिळणार संधी

Next
ठळक मुद्देशेतक-यांच्या निराशेत भरत्रुटी दूर करण्यासाठी संधी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - मोठा गाजावाजा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत दिवाळीपूर्वी शेतक:यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र पात्र शेतक:यांच्या यादीबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत  राज्यातील सर्व याद्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल 94 याद्या (एका यादीत सुमारे 700 याप्रमाणे जवळपास 65 हजार 800 शेतक:यांचे अजर्) ना-मंजूर करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र दिवाळीच्या आठवडाभरानंतरही शेतक:यांच्या पदरी निराशाच असल्याचे दिसून येत आहे. 
श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 46 हजार 53 जणांचे (कुटुंब व्याख्येनुसार) कजर्माफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी एकूण 876 याद्या अपलोड करण्यात आल्या.  यामध्ये काही 8 याद्यांना (5 हजार 600 अजर्) मंजुरी मिळाली असून काही प्रतीक्षेत, काही प्रक्रियेत आणि काही अंशत: मंजुरी मिळाली आहे. मात्र 94 याद्या (एका यादीत सरासरी 500 ते 700 जणांचे अजर्) नामंजूर करण्यात आल्याने काय होते? याकडेच सर्वाचे लक्ष लागलेले आहे. 
शेतक-यांच्या निराशेत भर
ज्या शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहे, त्यांच्या चार रंगात याद्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिरव्या रंगातील यादी म्हणजे पात्र शेतकरी. त्यामुळे कजर्मुक्ती द्यायची असेल तर ही यादी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाळीपूर्वीच प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नसून आठवडाभरानंतरही हा घोळ कायम असताना त्यात आता नामंजूर याद्यांची संख्या जास्त असल्याने शेतक:यांच्या निराशेत भर पडण्याची शक्यता आहे.  
त्रुटी दूर करण्यासाठी संधी
या अपात्र याद्यांमध्ये किरकोळ त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतक:यांसाठी ही एक समाधानाची ठरू पाहत आहे. 

Web Title: 65 thousand in Jalgaon district, the application for rejecting the application of the farmer, the opportunity to get rid of the error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.