ठळक मुद्दे२ लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांचा भार २ हजार प्राध्यापकांवर शिक्षणाची बिकट स्थितीप्राध्यापक भरतीस पात्र विद्यार्थ्यांचेही नुकसानलोकप्रतिनीधी देखील बोलायला तयार नाहीत

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील, जळगाव-दि.८-राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवर लावलेल्या ब्रेकमुळे खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील २ लाख हुन अधिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा भार २ हजार प्राध्यापकांवर आहे. शासनाकडून नवीन प्राध्यापक भरती होत नसल्याने  पात्र उमेदवारांना देखील नोकरीच्या संधी मिळत नाही.

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात महाविद्यालयांची संख्या व बाहेरुन येणाºया विद्यार्थ्यांसह खान्देशातील विद्यार्थ्यांची वाढत जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विद्यापीठाकडून आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. मात्र दर्जेदार शिक्षणाचा मुख्य घटक असलेल्या प्राध्यापकांच्या ६०० हुन अधिक जागा रिक्त असताना उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील गुणवत्ता कशी वाढणार ? हा प्रश्न देखील अनेक प्राध्यापक संघटना व शिक्षण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
 
१०० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक
जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्'ातील ८३ महाविद्यालयांमध्ये २ लाख हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या या महाविद्यालयांमध्ये २ हजार हुन अधिक प्राध्यापक शिक्षण देत आहेत. त्यामुळे एका प्राध्यापकावर अंदाजे १०० विद्यार्थ्यांचा भार आहे. महाविद्यालयांमध्ये अशी स्थिती असताना विद्यार्थ्यांना गुणवत्तेचा शिक्षण मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ‘लोकमत’ला मिळालेली रिक्त पदाची स्थिती ही जुलै २०१६ ची असून वर्षभरात १०० हुन अधिक निवृत्त झाल्याची धक्कादायक माहिती शिक्षण तज्ज्ञांनी ‘लोकमत’ ला दिली आहे.

प्राध्यापक  भरतीस पात्र विद्यार्थ्यांचेही नुकसान
दरम्यान, खान्देशात जवळपास १ हजार हुन अधिक विद्यार्थी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. मात्र भरती प्रक्रियेवर शासनाने यावर सध्या स्थगिती आणली असल्याने नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खासगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर किंवा कंत्राटवर काम करावे लागत  आहे. तसेच त्यांना केवळ ५ हजार ते ७ हजार रुपये दरमहिन्याला दिले जात आहे.  यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबत इतर व्यवसाय सुध्दा करावा लागत आहे.

लोकप्रतिनीधी देखील बोलायला तयार नाहीत
राज्यातील तोडक्या समस्यांसाठी विधानभवनात नेहमी गदारोळ करणारे लोकप्रतिनीधी देखील प्राध्यापक भरतीवर  काहीही बोलायला तयार नाहीत. जगाचा गुरु होण्याची क्षमता बाळगलेल्या भारतातील विद्यार्थ्यांनाच गुरु उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचा भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. तसेच खान्देशातील महाविद्यालयांप्रमाणे राज्यातील इतर  महाविद्यालयांची स्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत लोकप्रतिनीधींनी देखील शासनाकडे प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे.

विना अनुदानित महाविद्यालयांची स्थितीही बिकट
उमवि कार्यक्षेत्रात एकूण २१० महाविद्यालये आहेत. यामध्ये अनुदानित ८३ महाविद्यालये बाद केल्यास १२७ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. या  महाविद्यालयांमध्ये देखील ८०० हुन अधिक प्राध्यापकांच्या रिक्त आहेत. तर या महाविद्यालयांमध्ये १ हजार ८०० शिक्षकांवर २ लाखहुन अधिक विद्यार्थ्यांचा भार आहे.

जिल्हा निहाय रिक्त जागांची स्थिती

जिल्हा  - मंजुर पदे - भरलेली पदे - रिक्त पदे
जळगाव- १,४०० - १,१०० - ३००
धुळे- ८५० - ६५० - २००
नंदुरबार - ५०० - ३८० - १२०

कोट..
खान्देशातील ८३ महाविद्यालयांमध्ये ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र भरतीप्रतक्रियेवर स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी तासिका तत्वावर शिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत. तर इतर विद्यापीठांच्या तुलनेने उमविच्या महाविद्यालयांची स्थिती काही मानाने चांगली आहे.
-डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्चशिक्षण

प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. शासनाने प्राध्यापक भरती केल्यास विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळू शकते. तसेच अनेक विद्यार्थी प्राध्यापक भरतीस पात्र आहेत. त्यांना देखील रोजगार मिळू शकणार आहे. याबाबत प्राध्यापक संघटनांकडून नेहमी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
-प्रा.बी.पी.सावखेडकर, जनरल सेक्रेटरी,एन.मुक्टो.संघटना