महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील ३७ जण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 07:58 PM2018-07-18T19:58:19+5:302018-07-18T20:01:42+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाºयांनी दिले आहेत.

37 people from Jalgaon expelled on the backdrop of municipal elections | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील ३७ जण हद्दपार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील ३७ जण हद्दपार

Next
ठळक मुद्देहद्दपारीचे ३७ प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केलेआणखी ३८ हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांकडे प्रलंबितशनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ६ जण हद्दपार

जळगाव: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाºयांनी दिले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.
यापैकी ३१ जणांचा प्रस्ताव २०१७-१८ मधील होता. त्यावर कारवाई प्रस्तावित होेती. त्यातच मनपा निवडणुका जाहीर झाल्यान पोलिसांकडून आणखी ६ जणांचे प्रस्ताव प्राप्त झाले. हे सर्व ३७ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाºयांनी मंजूर केले आहेत. आणखी ३८ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्याकडे तपासासाठी प्रलंबित असल्याचे समजते.
२५ जुलै २०१८ ते ५ आॅगस्ट २०१८ या कालावधीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच २०१७-१८ मध्येच प्रस्तावित केल्यानुसार हद्दपार केलेल्यांमध्ये ३१ जणांचा समावेश आहेत.

Web Title: 37 people from Jalgaon expelled on the backdrop of municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.