जळगावात बनावट चावीने कुलूप उघडून लांबविली ३५ हजाराची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 10:52 PM2017-11-25T22:52:30+5:302017-11-25T22:54:44+5:30

बनावट चावीने घराचे कुलुप उघडून चोरट्यांनी छायाचित्रकार उपेंद्र गंभीर चव्हाण (वय ४८, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या घरातून लग्नाच्या आॅर्डरची ३५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातत्याने होणाºया चोºया, घरफोडी व दरोडा यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

35,000 rupees in cash with the fake key lock in Jalgaon | जळगावात बनावट चावीने कुलूप उघडून लांबविली ३५ हजाराची रोकड

जळगावात बनावट चावीने कुलूप उघडून लांबविली ३५ हजाराची रोकड

Next
ठळक मुद्दे बंद घर केले चोरट्यांनी टार्गेटघरमालक गेले होते सुरतलारामेश्वर कॉलनीत घरफोडी 


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५ : बनावट चावीने घराचे कुलुप उघडून चोरट्यांनी छायाचित्रकार उपेंद्र गंभीर चव्हाण (वय ४८, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या घरातून लग्नाच्या आॅर्डरची ३५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातत्याने होणा-या चो-या, घरफोडी व दरोडा यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उपेंद्र चव्हाण यांचा छायाचित्र काढण्याचा व्यवसाय आहे. रामेश्वर कॉलनीतील आदीत्या चौकात पत्नी आशा, मुलगी सिमरन, नेहा व मुलगा वंश अशासह ते एकत्र राहतात. साडूच्या मुलीचे लग्न असल्याने उपेंद्र चव्हाण हे परिवारासह २२ नोव्हेंबर रोजी सुरत येथे गेले होते. जातांना लग्नाच्या आॅर्डरचे अ‍ॅडव्हान्स घेतलेले ३५ हजार रुपये त्यांनी कपाटात ठेवले होते. घराशेजारी राहणारे अनिल सोनवणे यांनी शुक्रवारी चव्हाण यांना तुमचे घर उघडे असल्याची माहिती दिली. त्यांनी आम्ही बाहेरगावी असल्याने घरात जावून पाहणी करण्याचे सांगितले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता तर कपाटही उघडे होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी ही माहिती चव्हाण यांना दिली.
वर्दळीच्या ठिकाणी झाली घरफोडी
चव्हाण हे सुरत येथून शनिवारी दुपारी जळगावात दाखल झाले. घरातील कपाट ठेवलेली रक्कम तपासली असता गायब झाल्याचे लक्षात आल्याने चव्हाण यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. काही कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली. दरम्यान, चव्हाण यांचे घर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. तरीही येथे चोरी झाली. चोरट्यांनी जातांना दोन्ही दरवाजे उघडे ठेवले होते.

Web Title: 35,000 rupees in cash with the fake key lock in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.