चाळीसगाव तालुक्यात कर्जमाफीसाठी 13 हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:37 AM2017-09-24T11:37:32+5:302017-09-24T11:41:42+5:30

106 गावांमधील शेतक:यांचा समावेश : 17 हजार 571 थकबाकीदार

13,000 applications for loan forgiveness in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात कर्जमाफीसाठी 13 हजार अर्ज

चाळीसगाव तालुक्यात कर्जमाफीसाठी 13 हजार अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देजि. प.च्या 24 केंद्रावरुन संकलन  81 सोसायटय़ांचे 44 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज 17 हजार 571 थकबाकीदार

जिजाबराव वाघ/ ऑनलाईन लोकमत 

चाळीसगाव, जि. जळगाव,  दि. 24 - राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्ज माफीसाठी 22 रोजी मुदतीअखेर  चाळीसगाव तालुक्यातील 13 हजार शेतक:यांनी अर्ज दाखल केले असून ही आकडेवारी फक्त जि.प.च्या माध्यमातून राबविलेल्या 24 संकलन  केंद्रांवरील आहे. महाईसेवा केंद्रांवरही शेतक:यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहे. त्याची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर एकूण कर्जमाफीच्या अर्जाची संख्या वाढेल. अशी माहिती सहाय्यक निबंधक  ए. डी. जगताप यांनी दिली. 
कर्जमाफीचा फायदा फक्त शेतक:यांनाच मिळाला पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले होते. 1 ऑगस्ट पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर पयर्ंत देण्यात आली होती. त्यानंतर 22 पयर्ंत मुदत वाढविण्यात आली. 22 रोजी मुदतीअखेर  चाळीसगाव तालुक्यातील 13 हजार शेतक:यांनी ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज सादर केले.  106 गावांमध्ये 24 केंद्रांवर हे अर्ज भरुन घेण्यात आले. महाईसेवा केंद्रांवरही शेतक:यांनी अर्ज भरले असून एकूण आकडेवारी लवकरच संकलित केली जाणार आहे. 

17 हजार 571 थकबाकीदार
तालुक्यातील 81 विविध कार्यकारी सोसायट्यांचेही शेतकरी थकबाकीदार आहे. ही संख्या 17 हजार571 असून 81 पैकी 35 सोसायटय़ांची अंतिम तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. 
44 कोटी 60 लाख रुपये थकबाकी
सहाय्यक निबंधक विभागाने सोसायट्यांनी शेतक-यांना दिलेल्या  कर्जांची माहिती संकलित केली आहे. यात 17 हजार 571 शेतक-यांकडे 44 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. शेतक-यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असली तरी दिवाळीपुर्वी कर्जमाफीची रक्कम बँकांमध्ये जमा होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

Web Title: 13,000 applications for loan forgiveness in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.