धक्कादायक : वडिलांच्या जाचास कंटाळून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या, पारोळा तालुक्यातील राजवड येथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:00 PM2018-07-02T13:00:15+5:302018-07-02T13:23:55+5:30

वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल

13-year-old girl commits suicide in Rajwad in Parola taluka | धक्कादायक : वडिलांच्या जाचास कंटाळून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या, पारोळा तालुक्यातील राजवड येथील

धक्कादायक : वडिलांच्या जाचास कंटाळून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या, पारोळा तालुक्यातील राजवड येथील

googlenewsNext
ठळक मुद्देमुलीच्या वडिलास अटकदुर्दैवी घटना

पारोळा, जि. जळगाव - तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथे छकुली सुरेश देवरे या १३ वर्षीय मुलीने वडील दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असल्याने कंटाळून ३० रोजी दुपारी दोन वाजता विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
आदर्श गाव राजवड येथील सुरेश गंभीर देवरे यांची १३ वर्षीय मुलगी छकुलीला घरातील वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिला सुरेश देवरे हे त्रास देत होते. त्या छळाला कंटाळून छकुलीने ३० जून रोजी दुपारी दोन वाजता राहाते घरात काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले. शेजाऱ्यांना सदर मुलगी पडलेली दिसल्याने तिला सायंकाळी साडेपाच वाजता १०८ रुग्णवाहिका मागवून तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा सहा वाजता मृत्यू झाला. याबाबत छकुलीचे मामा सुनील रामा पटाईत रा. कृष्णापुरी बहिरम नगर पाचोरा यांनी पारोळा पो. स्टे. ला फिर्याद दिल्यावरून मुलीचे वडील सुरेश देवरे विरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुरेश देवरे यास अटक करण्यात आली आहे.
गावात लग्न होते त्यामुळे सुरेशने छकुलीला दोन पोळ्या टाकून द्यायला सांगितले असता तिने त्या बनवून दिल्या नाहीत म्हणून मी दोन चापट मारल्याचे सुरेशने सांगितले. सुरेशची पत्नी ७ वर्षांपूर्वी मरण पावली आहे तिला तीन मुली असून मोठीचे लग्न झाले आहे. दुसरी ही छकुली होती तर तिसरी ११ वर्षांची परी ही मावशीकडे राहते. घरात छकुली तिचे आजी - आजोबा व वडील असे राहत होते.

Web Title: 13-year-old girl commits suicide in Rajwad in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.