रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:32 AM2019-05-06T00:32:25+5:302019-05-06T00:32:44+5:30

रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे.

Will the fate of the roads ever shine? | रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ?

रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले, तर रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे.
शहरातील अत्यंत महत्वाचा असा भाग रेल्वेस्थानक रस्ता काँक्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शहरातंर्गत अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर मंमादेवी ते रेल्वेस्थानक, सतकर कॉम्पेलक्स ते अंबड चौफुली या खड्डेमय रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा न्यायालय या महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी मंमादेवी ते रेल्वेस्थानक, व सतकर कॉम्पलेक्स ते अंबड चौफुली हे महत्वाचे मार्ग आहे. मात्र त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रेल्वेतून येणाऱ्या अभ्यागतांना या खड्डेमय रस्त्याचे दर्शन घडते, ही बाब जालना शहरासाठी दुर्दैवी म्हणावी लागते. शहरातील अनेक नागरिकांनी मंमादेवी मंदीर ते रेल्वेस्थानक, सतकर कॉम्पलेक्स ते अंबड चौफुली या रस्त्याचे काँक्रिटीकरण करुन त्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी केली आहे.
तर अंबड चौफुली, मंमादेवी मंदिरापासून सुरु होणारा सदर रस्ता ८० फुटांचा आहे. एवढा मोठा रस्ता असला तरी आजमितीला तो अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची गरज असून, या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज
या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
परंतु, हेच दोन रस्ते बाकी असल्याने याकडे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष घालून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, अनेक वेळा शहरातील नागरिकांनी नगरपालिकेला रस्ता दुरुस्तीबाबत निवेदने दिली आहे. परंतु, जालना नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले.

Web Title: Will the fate of the roads ever shine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.