हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:44 AM2018-08-03T00:44:52+5:302018-08-03T00:45:12+5:30

भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tears in eyes of the farmers due to green chillies ..! | हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील हिरव्या मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वालसावंगी येथील
बाजारपेठेत हिरव्या मिरचीला केवळ १५ रुपये भाव मिळाला.यात खर्चच अधिक झाल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथील बाजारपेठेपेक्षा दुस-या बाजारपेठेत अधिक भाव मिळत असल्याने व्यापारी मुद्दाम कमी भावात मिरची खरेदी करत असल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. येथिल बाजारपेठेत दररोज ४ वाजता लिलाव पद्धतीने हराशी होते. परंतु लिलाव प्रत्येक गाड़ीचा न करता एकाच गाड़ीचा होतो व तो लिलावावर सर्वात जास्त बोली लागते.यामुळे सर्व शेतक-यांना समान भाव मिळत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लिलाव प्रत्येक मिरची पोत्याचा झाला पाहिजे अशी शेक-यांची मागणी आहे. मिरचिचा लिलाव हा धावड़ा - वालसावंगी या मुख्य मार्गावर होत असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा लिलाव दुसरीकडे घ्यावा अशी वाहनधारकांची मागणी आहे.
यंदा परिसरातील शेतक-यांनी मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेले अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पन्न तर सोडाच परंतू लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आज तरी मिरचिने पाणी आणले आहे. लिलाव होतानाचा भाव हा सर्व शेतक-यांना समान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाव कधी वाढेल याकडे शेतक-यांचे लक्ष लागून आहे.
उत्पादन खर्च अधिक होत आहे भाव कमी असल्याने परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. लिलाव पद्धतीत वेगळा भाव करतात व प्रत्यक्ष हातात कमी भाव देतात. असा भेदभाव न करता सरसकट शेतक-यांना जो भाव मिळाला तोच भाव सर्वांना द्यावा अशी मागणी येथील शेतकरी भानुदास खड़के, भगवान वाघ, राजू कोथळकर, नारायण गवळी, यांच्यासह इतर शेतक-यांनी केली आहे.

Web Title: Tears in eyes of the farmers due to green chillies ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.