वाळू चोरी रोखण्यासाठी बैठे पथक स्थापन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:48 AM2018-12-05T00:48:32+5:302018-12-05T00:48:43+5:30

अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी उस्वद रोड, पूर्णा पाटी व बेलोरा चौफुली अशा तीन बैठ्या पथकाची स्थापना सोमवारी तहसीलदारानी केली आहे.

Setting up a sit-in to prevent the evasion of sand! | वाळू चोरी रोखण्यासाठी बैठे पथक स्थापन !

वाळू चोरी रोखण्यासाठी बैठे पथक स्थापन !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळुची चोरी सुरु आहे. स्थानिक तलाठी व कोतवाल हे वाळू चोरी रोखण्यात अपयशी ठरत आहेत. मंठा तालुक्यातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी उस्वद रोड, पूर्णा पाटी व बेलोरा चौफुली अशा तीन बैठ्या पथकाची स्थापना सोमवारी तहसीलदारानी केली आहे.
पूर्णा नदीपात्रातून वझर सरकटे, भुवन, पोखरी केंधळे, किर्ला, वाघाळा, टाकळखोपा, दुधा, सासखेडा, इंचा, पूर्णा पाटी, लिंबखेडा, हनवतखेडा, कानडी, उस्वद- देवठाणा व खोरवड या गावाच्या हद्दीतून स्थानिक ट्रॅक्टर, टॅम्पो व टिप्परधारक अवैधरीत्या वाळू उपसा व चोरी करुन तालुक्याबरोबर जिंतूर व विदर्भात विक्री करतात. पूर्णा नदीतील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असून, यातून मोठी उलाढाल होते.
याबाबत तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता, तालुक्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तीन बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, या बैठ्या पथकात एक तलाठी व कोतवाल असणार आहे.

Web Title: Setting up a sit-in to prevent the evasion of sand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.