पावसाचा महाविक्रमी वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:44 AM2018-08-18T00:44:24+5:302018-08-18T00:44:41+5:30

देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

Recordbreak rainfall | पावसाचा महाविक्रमी वर्षाव

पावसाचा महाविक्रमी वर्षाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
दीड महिन्याच्या खंडा नंतर गुरूवारी पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ही २३६ मिलिमीटर एवढीच होती. तर ही पावसाची सरासरी शुक्रवारी सकाळी ८ वाजता चक्क ३४९ मिलिमीटरवर पोचली. त्यामुळे २४ तासात जालना जिल्ह्यात ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. महसूल मंडळात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा आहे.
जालना १३२.६३, बदनापूर १४२.६०, भोकरदन ८८.८६, जाफराबाद ९३.८०, परतूर १३४.२०, मंठर ११६, अंबड ७७.२९ आणि घनसावंगी १२३.५७ असा एकूण ११३.६३ मिलिमीटर पाऊस गुरूवारी रात्री पडला. जो एक विक्रमी पाऊस म्हणून याची जिल्ह्यात नोंद झाली आहे. या पावसासुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व नदी, नाले ओथंबून वाहिले. दीड महिन्याच्या खंडा नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने मूग, तूर, कपाशी, मका आणि सोयाबीन पिकांना जीवनदान मिळाले आहे. मध्यंतरी कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार जालना जिल्हा दुष्काळाच्या गडद छाायेत गेला होता.
त्यामुळे येथील महसूल प्रशासनाने खरिप हंगामातील नुकसानीचे पंचनामे करावेत की, काय येथपर्यंत विषय पोहोचला होता. पावसाचा खंड आणि त्यातच कपाशीवर झालेला बोंडअळीचा हल्ला यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. जालना जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याचा अहवाल कृषी विभागाने वरिष्ठांना दिला आहे. आता हा पाऊस पडल्याने कपाशीचे उत्पन्न घटले तरी, सोयाबीन आणि तुरीच्या माध्यमातून होणारे हे नुकसान भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Recordbreak rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.