खापर हिवरा येथे दोन लाखाची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:12 AM2019-03-11T00:12:40+5:302019-03-11T00:12:56+5:30

खापरदेव हिवरा येथे डॉ . गणेश रोडे यांच्या दुमजली बंगल्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली.

In Khapar Hivra, two lakh bribe stolen | खापर हिवरा येथे दोन लाखाची धाडसी चोरी

खापर हिवरा येथे दोन लाखाची धाडसी चोरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे डॉ . गणेश रोडे यांच्या दुमजली बंगल्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोने, चांदी आणि रोख रक्कम असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील डॉ . गणेश कुंडलिक रोडे यांचे तीर्थपुरी ते अंबड मार्गावर दुमजली घर आहे. तीर्थपुरी येथील दवाखान्याचे काम आटोपून डॉ. रोडे रात्री घरी आले होते. रात्री साडेअकरा वाजता जेवण करून ते बाराच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर शतपावली करण्यासाठी गेले होते. वयोवृध्द आई घरातील हॉलमध्ये झोपलेली होती. डॉ. रोडे यांचे वडील शेतात पाणी द्यायला गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घरात कोणी जागे नसल्याने चोरट्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ९० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या एकदाणी, दोन सोन्याच्या पोत ४८ हजार रुपये दोन सोन्याचे झुंबर जोड ४१ हजार रुपये तसेच नगदी अकरा हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
चोरी करून चोरटे घराच्या बाहेर जात असताना डॉ गणेश रोडे यांना दिसले त्यांनी आरडाओरड केली. मात्र चोरट्यांनी डॉ. रोडे यांच्या दिशेने दगड भिरकावून पसार झाले. रोडे यांनी तातडीने गच्चीवरुन खाली येऊन पाहणी केली असता कपाटातील मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. डॉ . रोडे यांच्या फिर्यादीवरुन गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: In Khapar Hivra, two lakh bribe stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.